



🔸कराटे असोसिएशन आणि लाईफ फाऊंडेशन सामाजिक संस्था, ब्रम्हपुरी तर्फे साजरा
✒️रोशन मदनकर(उप संपादक)
ब्रम्हपुरी(दि.9 मार्च ):-सन 1910 च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषेदत मांडलेल्या सुचनेनुसार, ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला.संपुर्ण जगातील महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो.
आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने, दि.8 मार्च 2022 रोजी मंगळवारला ब्रम्हपुरी येथील लोकमान्य टिळक शाळेच्या पटांगणावर, सायंकाळी 6 वाजता शहरातीलच कराटे असोसिएशन आणि लाईफ फाऊंडेशन सामाजिक संस्था, ब्रम्हपुरीच्या माध्यमातून कराटे प्रशिक्षण घेणाऱ्या सर्व विध्यार्थ्यांसोबत महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या सुंदरश्या कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्त्री शिक्षणाच्या जनक सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला, कराटे प्रशिक्षण घेणाऱ्या मुलींमार्फतच पुष्पहार अर्पण करून, सर्वांत लहान मुलीच्या हस्ते केक कापत करण्यात आली. नंतर या आयोजित कार्यक्रमाला मुख्य मार्गदर्शिका म्हणून लाभलेल्या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त युवा समाजसेविका कुमारी.पूनम कुथे यांनी सर्व मुलींना, “राष्ट्र उभारणीसाठी महिलांचा योगदान आणि आजच्या महिलांचे हक्क व अधिकार” अश्या विविध विषयांवर स्वतःचे मत, अनुभव सांगत योग्य ते मार्गदर्शन केले.
या नियोजित कार्यक्रमात कराटे असोसिएशनचे मुख्य मार्गदर्शक, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक सिहान गणेश लांजेवार सर, लाईफ फाऊंडेशनचे अध्यक्ष उदयकुमार पगाडे, सेंसाई क्रिष्णा समरीत, सेंसाई सचिन भानारकर, सेंसाई वैष्णवी ठेंगरी, सेंसाई भाग्यवान शास्त्रकार आणि बहुसंख्येने विध्यार्थी उपस्थित होते.


