Home महाराष्ट्र माझ्या कार्याची शाबासकी म्हणजे हा पुरस्कार – ब्रिजभूषण पाझारे

माझ्या कार्याची शाबासकी म्हणजे हा पुरस्कार – ब्रिजभूषण पाझारे

105

✒️पंकज रामटेके(घुग्घुस प्रतिनिधी)

🔹ब्रिजभूषण पाझारे यांना पुणे येथे पंचायत राज मंत्री कपिलजी पाटील साहेब यांचा हस्ते उत्कृष्ट सभापती पुरस्कार प्रदान

घुग्घुस(दि.9मार्च):- रोजी पुणे येथील अण्णाभाऊ साठे सभागृहात संपन्न झालेल्या महाराष्ट्र राज्यातील उत्कृष्ट जि.प सदस्य व सभापती, पंचायत समिती सदस्य व सभापती पुरस्कारात चंद्रपूर जिल्हातील नकोडा या छोट्याछा गावातून झेप घेत आज चंद्रपुर जि.प समाजकल्याण सभापती पदावर राहून विविध योजना आखून जिल्हातील नागरिकांनच्या सेवेत असणारे ब्रिजभूषण पाझारे महाराष्ट्रातील उत्कृष्ट सभापती पुरस्काराने सन्मानित झाले आहे. पुणे येथे पंचायत राज मंत्री कपिलजी पाटील साहेब यांचा हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. हि अभिमानाची बाब आहे.

पुणे येथे झालेल्या पुरस्कार सोहळ्यात हा पुरस्कार म्हणजेच माझा कार्याची मिलेली शाबासकी ची थाप आहे, मा.आ.सुधीरभाऊ मूनगंटीवार यांच्या मार्गदर्शनातून नागरिकांकरिता विविध योजना आखून कार्य करू शकलो. असे प्रतिपादन पाझारे त्यांनी यावेळी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here