Home महाराष्ट्र गेवराईत मोफत महिला आरोग्य तपासणी शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद

गेवराईत मोफत महिला आरोग्य तपासणी शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद

92

🔹जागतिक महिला दिनानिमित्त राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीचा स्तुत्य उपक्रम

✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114

गेवराई(दि.८मार्च):-गेवराई शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित केलेल्या मोफत महिला आरोग्य तपासणी शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबीराचे उद्घाटन सौ. विजेताताई विजयसिंह पंडित यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बीड येथील बारकुल हाँस्पिटलचे डॉ. अनिल बारकुल, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. महादेव चिंचोले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ..संजय कदम, स्त्रीरोग तज्ञ डॉ. गोपाल रांदड, त्वचारोग तज्ञ डॉ. पद्मांजली अमरसिंह पंडित, डॉ. अमित बायस, डॉ. संगीता तिडके आदी मान्यवर उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा तथा महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ. रुपालीताई चाकणकर यांच्या संकल्पनेतून संपूर्ण राज्यात प्रतिभा आरोग्य जनजागृती अभियाना राबवले जात आहे, त्या अंतर्गत गेवराई शहरातील महिलांसाठी गेवराई शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त मंगळवार दिनांक ८ मार्च रोजी मोफत महिला आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन सौ. विजेताताई विजयसिंह पंडित यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्य शहराध्यक्षा सौ. मुक्ताताई आर्दड म्हणाल्या की, माजी आमदार अमरसिंह पंडित व जि.प.चे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असतांना एक प्रकारचे चैतन्य निर्माण होते. आपण समाजासाठी कांहीतरी करू शकतो असा आत्मविश्वास निर्माण होतो. आज त्याचाच एक भाग म्हणून गेवराई शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या वतीने प्रतिभा आरोग्य जनजागृती अभियान अंतर्गत जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिला मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी डॉ..जाधव यांनी आपल्या मनोगतामध्ये महिलांना मार्गदर्शन करत असताना वैयक्तिक स्वच्छता, पोषण, आहार यावर भर द्यावा असे आवाहन केले. दिवसेंदिवस महिलांमधील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होणे ही चिंतेची बाब ठरत आहे, त्यासाठी आपला दैनंदिन आहार चौरस आसायला हवा जेणेकरून हिमोग्लोबिनची समस्या दुर होईल असेही ते म्हणाले. डॉ.संजय कदम यांनी मार्गदर्शन करतांना शासनाच्या आरोग्यदायी अशा अनेक योजना आहेत, त्या सुविधांचा लाभ घेणे गरजेचे आहे. अंगणवाडी शाळांमार्फत दिल्या जाणाऱ्या लोहयुक्त गोळ्या, सीरप मोफत दिल्या जातात. समुदाय आरोग्य अधिकारी यांच्यामार्फत समाजामध्ये समुपदेशन केले जाते तेही महिलांनी घ्यावे असे आवाहन त्यांनी केले.

या कार्यक्रमात डाॅक्टर असोसिएशन व उपजिल्हा रूग्णालय गेवराई यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त कोव्हिड काळात रुग्णसेवा केल्याबद्दल कर्तुत्ववान महिला म्हणून डाॅ. पद्मांजली अमरसिंह पंडित यांचा गौरव करण्यात आला. यावेळी तपासणी शिबारातील विविध कक्षाला सौ. विजेता विजयसिंह पंडित यांनी भेट देऊन अनेक रुग्णांची अस्तेवाईकपणे चौकशी केली.

या शिबिरामध्ये २१७ महिला रुग्णांची तपासणी करण्यात आली. शिबिर यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादी डाॅक्टर सेलचे शहराध्यक्ष डाॅ..सर्वोत्तम शिंदे, डाॅ.भागवत जाधव, डाॅ..अशोक काळे, डॉ.आंधळे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शहराध्यक्षा सौ.मुक्ताताई आर्दड, महिला तालुकाध्यक्षा शाहिन पठाण यांच्यासह पदाधिकारी सौ. पल्लवी गोगुले, सौ.जयश्री दाभाडे, सौ.शिवकन्या आरगडे, सौ.आशा सुरवसे आणि कार्यकर्त्यांनी परिपश्रम घेतले. या शिबिराला महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here