



🔹पट्टी विविध क्षेत्रातील कोरोनाच्या काळात कार्य केलेल्या महिलाच्या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये पुष्पगुच्छ देऊन सन्मान
✒️मोहोळ,तालुका प्रतिनिधी(नानासाहेब ननवरे)
कुरुल(दि.८मार्च):-जागतिक महिला दिनानिमित्त आज मंगळवारी कुरुल ग्रामपंचायत कार्यालयात कोरोना महामारीच्या काळात फील्डवर उत्कृष्ट काम केलेल्या आरोग्य सेविका,आशा वर्कर, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा सन्मान करण्यात आला.प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच चंद्रकला पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका ,आशा वर्कर व मदतनीस यांचा नारी शक्तीचा सन्मान म्हणून सरपंच चंद्रकला पाटील , ग्रामविकास अधिकारी सुवर्णा घाटे व ग्रामपंचायत सदस्या यांच्या हस्ते गुलाबपुष्प, मास्क व अल्पोपहार पाकीट देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी ग्रामपंचायत सदस्य मोहिनी घोडके, ग्रामविकास अधिकारी सुवर्णा घाटे, अंगणवाडी सेविका जयश्री अंकुशराव, अनुराधा गायकवाड यांची समयोचित भाषणे झाली.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य रोहिणी तगवाले, मोहिनी घोडके, अंजली गायकवाड,शंनू मुलाणी, संगीता शिंदे,आरोग्य सेविका एस के माने,एस आर बनकर,वैशाली निंबाळकर, डाटा ऑपरेटर दैवशाला लांडे- पाटील,अंगणवाडी सेविका संगीता रोडे,शोभा कुंभार,जयश्री अंकुशराव,बेबी गायकवाड, वर्षा भालेराव,मालन घोडके,अनुराधा गायकवाड,अंजली माने,कविता खरात, उमा गोरे, सुवर्णा शिंदे, मालन कुंभार, लक्ष्मी माने,उजवला खिलारे,रेणुका जाधव,अनिता डमरे, जयश्री घोडके, मनीषा जाधव, महादेवी सुतार, कल्पना पवार आदींसह सर्व सेविका, मदतनीस आशा वर्कर ,ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
फोटो: महिला दिनानिमित्त फिल्ड वर्क करणाऱ्या महिलांना कुरुल ग्रामपंचायतच्या वतीने सन्मानित करण्यात आले. यावेळी सरपंच चंद्रकला पाटील, ग्रामविकास अधिकारी सुवर्णा घाटे आदिंसह सदस्य दिसत आहेत .


