



✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114
बीड(दि.8मार्च):-सध्या रशिया व युक्रेन या दोन देशांमध्ये युद्ध सुरू आहे.दरम्यान या देशात भारतातील अनेक विद्यार्थी एमबीबीएस शिक्षणासाठी गेलेले आहेत.मात्र युद्धजन्य परिस्थिती असल्यामुळे हे विद्यार्थी आता भारतात परतण्यासाठी धडपड करत आहेत तर त्यांचे कुटुंबीय देखील भयभीत झालेले आहेत.यातच अनेक विद्यार्थी हे युक्रेन वरुन भारतात परतले असुन अनेक विद्यार्थी हे भारतात येण्याची वाट पाहताहेत. बीड जिल्ह्याच्या गेवराई मधील हाश्मी अंदलीब मेराज ही विद्यार्थीनी युक्रेन येथे एमबीबीएस च्या फायनल इयर चे शिक्षण घेत होती.मात्र युक्रेन रशीया मध्ये युद्ध सुरू असल्याने मेराज ही युक्रेन वरुन सहा मार्च रोजी आपल्या घरी म्हणजेच गेवराई येथे पोहचली. घरी पोहचल्यामुळे या विद्यार्थीनीसह तिच्या कुटुंबीयामध्ये आनंद दिसून आला .
हाश्मी अंदलीब मेराज ही विद्यार्थीनी युक्रेन वरुन आपल्या देशात आपल्या घरी परतल्याने बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी गेवराई येथील घरी येवून या विद्यार्थीनीची भेट घेवुन युक्रेन मधील परिस्थिती संदर्भात चर्चा केली.यावेळी जिल्हाधिकारी यांच्या समवेत सहायक पोलिस अधिक्षक रश्मिता राव , तहसीलदार श्रीराम भेंडे , नायब तहसीलदार शामसुंदर रामदासी, मंडळाधिकारी जितेंद्र लेंडाळ , तलाठी माणिक पांढरे सह प्रशासनातील लोक उपस्थित होते.





