Home महाराष्ट्र गंगाखेडला विद्यार्थीनींची आरोग्य तपासणी आणि समुपदेशन शिबीर संपन्न

गंगाखेडला विद्यार्थीनींची आरोग्य तपासणी आणि समुपदेशन शिबीर संपन्न

120

🔹साईसेवा प्रतिष्ठाण, सवंगडी समुहाचा ऊपक्रम 

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.8मार्च):- जागतीक महिला दिनाचे औचित्य साधत गंगाखेड येथे किशोरवयीन विद्यार्थीनींची आरोग्य तपासणी आणि समुपदेशन शिबीर घेण्यात आले. साईसेवा प्रतिष्ठाण आणि सवंगडी कट्टा समुह या सेवाभावी संस्थांच्या वतीने या ऊपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील सर्व प्रमुख विद्यालयांमध्ये हा ऊपक्रम राबवण्यात येणार असल्याची माहीती संयोजक गोविंद यादव, रमेश औसेकर यांनी दिली आहे.

गंगाखेड येथील सरस्वती विद्यालयात आज दिनांक ८ मार्च रोजी संपन्न झालेल्या या शिबीरात ईयत्ता आठवी आणि नववीत शिकणाऱ्या विद्यार्थीनींची आरोग्य तपासणी करण्यात आली. यात रक्त तपासणी करून हिमोग्लोबीनची कमतरता आढळून आलेल्या सात विद्यार्थिनींना औषधी वाटप करण्यात आली. यानंतर झालेल्या समुपदेशन शिबीरात डॉ. स्वाती हेमंत मुंडे यांनी मासीक पाळीच्या संदर्भात मार्गदर्शन केले. या काळात घ्यावयाची काळजी, योग्य आहार, औषधोपचार याबाबतीत त्यांनी विद्यार्थीनींचे शंका निरसन केले. यावेळी विद्यार्थिनींना मोफत पॅड चे वितरण करण्यात आले.

जेष्ठ सामाजीक कार्यकर्त्या प्रा. मंजु दर्डा, सौ. पुनम संतोष तापडिया, सौ. वर्षा गोविंद यादव, सौ. माया रमेश औसेकर, ऊपमुख्याध्यापीका सौ. वंदना जयंत अंबेकर, वैद्यकीय अधिक्षक डॉ हेमंत मुंडे आदिंची या प्रसंगी प्रमुख ऊपस्थिती होती. गंगाखेड ऊपजिल्हा रूग्णालयातील प्रयोगशाळा तंत्रज्ञ प्रविण जायभाये, श्री कुंभार यांनी आरोग्य तपासण्या केल्या. कार्यक्रमाचे प्रास्तावीक माया औसेकर यांनी, सुत्रसंचालन सौ. दामा मॅडम यांनी तर आभार प्रदर्शन सौ वर्षा यादव यांनी केले.

डॉ विद्यासागर लटपटे, संतोष तापडिया, अमोल कोकडवार यांच्या विशेष सहकार्यातून हा कार्यक्रम घेण्यात आला. पाहुण्यांचे स्वागत प्रतिष्ठाणचे अध्यक्ष गोविंद यादव, सवंगडी समुहाचे संयोजक रमेश औसेकर, मुख्याध्यापक मादरपल्ले सर यांनी केले. यशस्वीतेसाठी मनोज नाव्हेकर, भगत सुरवसे, कारभारी निरस, प्रकाश घण, सुहास देशमाने आदिंना परीश्रम घेतले.

*महिला दिनी, महिलांचा, महिलांसाठी कार्यक्रम !*
मासीक पाळी सारख्या नाजूक विषयावर मार्गदर्शन होणार असल्याने विद्यार्थीनींच्या मनावर दडपण येण्याची शक्यता होती. ही बाब लक्षात घेवून सेवाभावी संस्थाच्या पदाधिकाऱ्यांसह शाळेतील सर्व पुरूष कर्मचारी प्रतिमा पूजन आणि स्वागत समारंभ संपन्न होताच तेथून निघून गेले. फक्त महिला प्रतिनिधींच्या ऊपस्थितीतच समुपदेशन शिबीर घेण्यात आले. यामुळे विद्यार्थिनींनी डॉ स्वाती मुंडे यांच्याशी मनमोकळी चर्चा केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here