Home महाराष्ट्र गतिरोधक लावा अन्यथा रस्ता रोको आंदोलन

गतिरोधक लावा अन्यथा रस्ता रोको आंदोलन

64

🔸संभाजी ब्रिगेड ने दिला आंदोलनाचा इशारा .

✒️कारंजा(पुरोगामी न्युज नेटवर्क)

कारंजा( घा )(दि.8मार्च):- कारंजा शहरातील प्रमुख सिमेंट रस्त्यावरून जाणाऱ्या भरधाव वाहनांमुळे होणाऱ्या अपघाताच्या प्रमानाला आळा बसविण्याकरिता अपघात स्थळावर गतिरोधक तयार करावे या मागणीचे पत्र संभाजी ब्रिगेड तर्फे नगरपंचायत मुख्यधिकारी साळवे यांना देण्यात आले .

कारंजा शहरातील मुख्य रस्ता गोळीबार चौक ते पंचायत समिती दरम्यान श्री .राजनजी कुरडा यांचे दुकानासमोर रस्त्यावर दोन्ही बाजूनी गतिरोधक लावणे गरजेचे आहे .अलीकडे यापरिसरात वेगाने वाहने चालविल्याकुळे पादचारी यांचे अपघाताचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे गतिरोधक लावावे अन्यथा रस्ता रोको आंदोलनाचा इशारा साळवे यांना पत्र देतांना संभाजी ब्रिगेड चे नेते पियुष रेवतकर यांनी केला .

Previous articleपुस्तके भेट देऊन सम्राट अशोक जयंती साजरी*
Next articleगंगाखेडला विद्यार्थीनींची आरोग्य तपासणी आणि समुपदेशन शिबीर संपन्न

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here