




✒️वसमत(पुरोगामी न्युज नेटवर्क)
वसमत(दि.8मार्च):–भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीने जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित जिल्हा हिंगोली महिला प्रभारी गंगासागर कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली महिलांना बाबासाहेबांनी मिळवून दिलेले अधिकार व आपल्या जीवाचे रान करून सावित्रीबाई ने महिलांना दिलेले शिक्षणा फायदा आपल्या जीवनात कशा प्रकारे घ्यावा.
म्हणजे स्त्री सक्षम होईल हे सांगण्यात आले. आसे मत गंगासागर कांबळे यांनी व्यक्त केले. बी.आर कांबळे,मिलिंद आळणे बार्टी रेखा काबळे ग्रामपंचायत सदस्य नंदुबाई काबळे पोलीस पाटील अमोल काबळे सामाजिक कार्यकर्ते विनोद काबळे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




