Home महाराष्ट्र तळागाळातील महिला मुख्य प्रवाहात आल्या पाहिजेत – ॲड. भाग्यश्री ढाकणे

तळागाळातील महिला मुख्य प्रवाहात आल्या पाहिजेत – ॲड. भाग्यश्री ढाकणे

211

🔸आष्टी तालुका युवा पत्रकार संघाचे कार्य कौतुकास्पद – सभापती बद्रीनाथ जगताप

🔹युवा पत्रकार संघाच्या राज्यस्तरीय “उत्कृष्ट नारी सन्मान” पुरस्काराचे वितरण

✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

आष्टी(दि.8मार्च):-शिक्षणामुळे अनेक महिला वेगवेगळ्या क्षेत्रात मोठ्या पदावर कार्यरत आहेत ही अभिमानाची बाब आहे परंतु सध्याही तळागाळातील महिला पिछाडलेले जिवन जगत आहेत त्या मुख्य प्रवाहात आल्या पाहिजेत असे भाजपा युवती प्रदेशाध्यक्ष ॲड. भाग्यश्री ढाकणे या दि. ७ रोजी आष्टी येथे पंचायत समिती सभागृहात आष्टी तालुका युवा पत्रकार संघाने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय उत्कृष्ट नारी सन्मान पुरस्काराचे वितरण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होत्या. तर सभापती बद्रीनाथ जगताप अध्यक्षस्थानावरून बोलताना म्हणाले की, आष्टी तालुका युवा पत्रकार संघ हा नेहमी सामाजिक कार्यात अग्रसर असतो मागिल ४ वर्षापासून जागतिक महिला दिनानिमित्त पुरस्काराने सन्मानित करून कर्तबगारी करणा-या महिलांना प्रोत्साहन करतात यामुळे महिलांना प्रेरणा मिळत आहे.

आष्टी तालुका युवा पत्रकार संघाच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्त दरवर्षी देण्यात येणारा राज्यस्तरीय नारी सन्मान २०२२ चे पुरस्कार आदर्श माता – मंगल माने मुर्शदपुर आष्टी, आदर्श सरपंच – शुभांगी दीपक खिळे, युवती सुंदरी – प्रतिभा बबन सांगळे, पोलीस अधिकारी – राणी सानप, उत्कृष्ट वैद्यकीय अधिकारी – इमराना शेख, उत्कृष्ट महिला वकील – ॲड. सीमा गवारे, आरोग्यसेविका – स्नेहल राऊत, आदर्श तलाठी – नंदाताई शिंदे, उत्कृष्ट ग्रामसेविका – उज्वला थोरे, आदर्श शिक्षिका – रोहिणी कार्ले, कन्याशाळा, बालसंगोपन सेविका – रेश्मा चौधरी, सक्षम बचत गट अध्यक्ष – शहनाज शेख, राष्ट्रीय खेळाडू – आरती नागरे, उत्कृष्ट आशा सेविका – पूनम श्रीखंडे, उत्कृष्ट कृषी सहाय्यिका – आशा झांजे वाहिरा, डॉ. प्रा. माया प्रताप रणसिंग – हिंदी एचडी यांना स्मृतिचिन्ह, शाल, पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. आष्टी पंचायत समितीचे सभापती बद्रीनाथ जगताप यावेळी अध्यक्ष स्थानावरून बोलताना म्हणाले की, आता महिला कुठल्याच क्षेत्रात मागे नसून पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सर्व क्षेत्रात कार्यरत आहेत.

अहमदनगर येथील मूळ रहिवासी व अमेरिका येथे पर्यावरण शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत असणाऱ्या डॉक्टर संगीता तोरडमल यांनी भ्रहमणध्वनी वरून जागतिक महिला दिनानिमित्त उपस्थित महिलांना शुभेच्छा दिल्या. गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी उद्धव सानप, तालुका आरोग्य अधिकारी जयश्री शिंदे, पोलीस अधिकारी राणी सानप, राजेंद्र लाड, अँड. सिमा गवारे, शिक्षिका रोहीणी कार्ले, सरपंच शुभांगी खिळे आदींनी मनोगत व्यक्त केले.

अध्यक्षस्थानी पंचायत समिती चे सभापती बद्रीनाथ जगताप, प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा युवती प्रदेशाध्यक्षा ॲड. भाग्यश्री ढाकणे, गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे, तालुका आरोग्य अधिकारी जयश्री शिंदे, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी उद्धव सानप,. कृ.उ.बा.समितीचे सभापती दत्तात्रय जेवे, सहाय्यक पोलिस निरीक्षक भाऊसाहेब गोसावी, आदर्श सरपंच राम बोडखे, राजेंद्र लाड, संतोष दाणी, दिपक खिळे, प्रताप रणशिंग आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन आदर्श शिक्षीका अनिता चव्हाण यांनी तर प्रास्ताविक पत्रकार अविशांत कुमकर व आभार पत्रकार संघाचे अध्यक्ष अविनाश कदम यांनी मानले.
—————–
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आष्टी तालुका युवा पत्रकार संघाचे अध्यक्ष अविनाश कदम, सचिव अविशांत कुमकर, निसार शेख, जावेद पठाण, अण्णासाहेब साबळे, किशोर निकाळजे, यशवंत हंबर्डे, प्रेम पवन, संतोष नागरगोजे, अक्षय विधाते, तुकाराम भवर आदींनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here