




✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ) मो.9823995466
उमरखेड(दि .7 मार्च):-आज बाबासाहेब आंबेडकर असते तर ते जगाचे झाले असते जगाला युद्धापासून वाचवण्यासाठी त्यांनी प्रयन्त केला असता म्हणून समाजात बुद्ध पेरला की बाबासाहेब उगवतो म्हणून जगाला युध्दाची नाही बुध्दाची गरज आहे.असे प्रतिपादन प्रख्यात कवी दंगलकार नितीन चंदनशिवे सांगली यांनी केले.
ते कारखेड फाटा येथे आयोजित सहाव्या सम्राट अशोक बुद्ध धम्म परिषदेमध्ये प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
या परिषदेच्या सायंकाळच्या सत्रात प्रमुख उपस्थिती म्हणून ऑल इंडिया पॅंथर संघटना प्रमुख दीपक केदार, डॉ. भास्कर दवणे, डॉ अनिल काळबांडे, डॉ . प्रेम हनवते, डॉ .श्याम दवणे, अँड. धम्मपाल पाईकराव, माजी सरपंच राजेंद्र कदम, संदीप काळबांडे, माधव वाठोरे, अँड. डी एफ.हरडफकर, पत्रकार दत्ता काळे, राहुल काळबांडे ‘वीरेंद्र खंदारे, भीमराव सोनुले, सिध्दर्थ दिवेकर (युवा पत्रकार), प्रफुल दिवेकर (सामाजिक कार्यकर्ते उमरखेड) इत्यादी उपस्थित होते.
सायंकाळच्या प्रबोधनाच्यासत्रात दीपक केदार यांनी देशात सर्वसामान्यांसह गोरगरीब होणारें वाढते अन्याय अत्याचार याचा पाढा वाचून संविधान कसे धोक्यात आले आहे.
खाजगीकरणाच्या माध्यमातून आरक्षण संपवल्या जात आहे आरक्षण संपण्यासाठी कंपन्या विकल्या जात आहेत.
जर संविधान आपल्याला वाचवायचा असेल तर खाजगीकरण आपल्याला संपवावे लागेल त्यासाठी सर्वच समाज बांधवांनी एकत्र येण्याचा त्यांनी आव्हान केले.
या परिषदेचे प्रास्ताविक सुनील कवडे यांनी केले.
यावेळी डॉ . प्रेम हनवते डॉ. अनिल काळबांडे, डॉ दवणे यांनी परिषदेच्या माध्यमातून बुद्धाचे बाबासाहेबाचे समतावादी मानवतावादी विचार समाजामध्ये पेरले पाहीजे तेव्हाच मानवतेचे पीक येईल त्यासाठी आपल्याला सर्वांना एकत्र यावे लागेल अशा आशावाद व्यक्त केला.
या परिषदेचे अध्यक्ष धोंडबा विनायते तर स्वागत अध्यक्ष माजी आमदार विजय खडसे हे होते.
पुढे बोलताना चंदनशिवे म्हणाले, विचाराने बदल करावा लागेल डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ वाढणारी गर्दी त्यांचे फोटो काढण्यासाठी होणारी गर्दी जोपर्यंत वाचनालयात जाऊन शिक्षणाच्या क्षेत्रात यश प्राप्त करणार नाहीत तोपर्यंत परिवर्तन होणार नाही.
माझी माणसं सुटा बुटात दिसावी यासाठी जाती धर्माच्या भिंती तोडून जातीला चुना लावावा लागेल आणि माणूस व्हावा लागेल आपल्या कांबळे नावाच्या कवितेतून त्यांनी आपण धम्म परिषदेच्या मांडवाखाली परिवर्तनाचं एक स्वप्न पाहिले पाहिजे पंढरीचा पांडुरंग माझ्यासाठी बुद्ध झाला पाहिजे म्हणून आपण आजही संविधानिक चळवळ चालवली पाहिजे असे त्यांनी प्रतिपादन केले.
या कार्यक्रमाचे आणि धम्म परिषदेचे आयोजक सुधाकर कांबळे यांनी बुद्धाचे बाबासाहेबांचे मानवी कल्याणाचे विचार सर्वसामान्य मध्ये पेरावे या उद्देशाने आमचे धम्म परिषदेचे आयोजन केलं आहे.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा . गजानन दामोदर सुधाकर कवडे यांनी केले.सायंकाळी प्रख्यात गायिका दीपाली इंगळे आणि चेतन लोखंडे यांचा वैचारिक बुद्ध भीम गीतांचा कार्यक्रम संपन्न झाला भव्य दिव्य असणाऱ्या या धमा परिषदेला सर्वच जाती-धर्माचे बांधव उपस्थित होते.या धम्म परिषदेच्या यशस्वी ते साठी आयोजकांनी तन मन धनाने प्रयन्त केले.




