Home महाराष्ट्र इतर राजकीय पक्षाच्या शेकडो कार्यकर्त्यांचा संभाजी ब्रिगेड मध्ये प्रवेश

इतर राजकीय पक्षाच्या शेकडो कार्यकर्त्यांचा संभाजी ब्रिगेड मध्ये प्रवेश

124

✒️कारंजा(घा)(पुरोगामी न्युज नेटवर्क)

कारंजा(घा)(दि.7मार्च):-गेल्या एक वर्षा अगोदर कारंजा मध्ये संभाजी ब्रिगेड ची शाखा स्थापन करण्यात आली .सतत एक वर्ष सामाजिक कार्य करून जनतेच्या समस्यांसाठी लढा देत संभाजी ब्रिगेड ने तालुक्यात एक मजबूत राजकीय अस्तित्व निर्माण केलेल आहे .शंभर टक्के राजकारण व शंभर टक्के समाजकारण या धोरणावर चालत असलेल्या संभाजी ब्रिगेड कडे तालुक्यातील जनतेचा कौल पाहायला मिळत आहे .संभाजी ब्रिगेड चे नेते पियुष रेवतकर यांच्या नेतृत्वावर विश्वास करून कारंजा तालुक्यातील ढाबा या गावातील 100 वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांचा संभाजी ब्रिगेड मध्ये जाहीर प्रवेश झाला व कारंजा शहरातील अनेक महिला कार्यकर्त्यांचा संभाजी ब्रिगेड मध्ये प्रवेश झाला .

संभाजी ब्रिगेडच्या वेगवेगळ्या पदावर अनेक कार्यकर्त्यांची नियुक्ती करण्यात आली .तालुक्यात सर्वात जास्त गतीने वाढणारा पक्ष संभाजी ब्रिगेड आहे व येणाऱ्या पंचायत समिती ,जिल्हापरिषद निवडणुकीत संभाजी ब्रिगेड यश प्राप्ती करणार असल्याचे संभाजी ब्रिगेड चे नेते पियुष रेवतकर म्हणाले .तालुक्यात संभाजी ब्रिगेड ला मिळत असलेल्या जनतेच्या प्रतिसादाला पाहून येणाऱ्या काळात तालुक्यातील राजकीय वातावरण त्रिकोनिय पाहायला मिळणार .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here