




🔸अभ्यासानेच तुमच्या आयुष्यात ज्ञानाची पहाट उगवेल – कुलगुरू डॉ प्रशांत बोकारेंचे प्रतिपादन
✒️रोशन मदनकर(उप संपादक)
ब्रह्मपुरी (दि.7मार्च ):-” महाविद्यालय लोकप्रिय का होते,तर जे महाविद्यालय समाजाचा विचार करत विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देते,सावावून घेते ती संस्था लोकप्रिय होते.या काळात स्वतःची योग्यता वाढविणे आवश्यक असून समाजातल्या गरजा शिक्षणातून भागल्या पाहिजेत.शिक्षण ही आपली ढाल झाली पाहिजे.तुमचे कौशल्य, विद्या कुणी चोरुन नेत नाही.ही संस्था कुसुमाग्रजांच्या कवितेतील,माजघरातील मंद दिव्याच्या ज्योतीसारखी सतत तेवत राहणारी आहे,म्हणून येथील विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले,अभ्यास केला तर आयुष्यात ज्ञानाची पहाट उगवेल !
“असे बहूमोल मार्गदर्शन गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारेंनी केले.यावेेळी संस्थेच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.ते येथील नेवजाबाई हितकारणी महाविद्यालयात पदवी प्रमाणपत्र व शैक्षणिक श्रेष्ठता शिष्यवृत्ती वितरण सोहळ्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.अध्यक्षस्थानी ने.भै.हि.शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अॅड.प्रकाश भैया होते.प्रमुख अतिथीमध्ये संस्था सचिव अशोक भैया,सहसचिव अॅड.भास्करराव उराडे,सदस्य प्रा.सुभाष बजाज, प्रा.जे एन केला,आयोजक प्राचार्य,डॉ एन एस कोकोडे, उपप्राचार्य डॉ.डी एच गहाणे,प्राचार्य,डॉ हर्षा कानफाडे,प्रभारी प्रा.आकाश मेश्राम व्यासपीठावर उपस्थित होते.याप्रसंगी पाहूण्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.पाहूण्यांच्या हस्ते 141 गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांना प्रमाणपञ,स्मृतिचिन्ह व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.यावेळी डॉ.पद् माकर वानखडे,डाॅ.रतन मेश्रामांचाही आचार्य पदवी प्राप्त केल्याबद्दल गौरव केला गेला.
कार्यक्रमाची सुरुवात गोंडवाना गीताने झाली.या वितरण सोहळ्याचे प्रास्ताविक,पाहुण्यांचे परिचय प्राचार्य,डॉ एन एस कोकोडेंनी केले.संचालन प्रा बालाजी दमकोंडवार,पुरस्कार वितरण सोहळ्याचे प्रा दलेश परशुरामकर,डॉ दर्शना उराडे,डाॅ जे के दुपारे,प्रा ए एस खोब्रागडेंनी केले तर आभार प्रभारी प्रा. आकाश मेश्रामांनी मानले.यशस्वीतेसाठी अन्य समिती अध्यक्ष डॉ मोहन वाडेकर,डाॅ तात्याजी गेडाम,डाॅ राजेंद्र डांगे,डाॅ धनराज खानोरकर,डाॅ भास्कर लेनगुरे,डाॅ अजित खाजगीवाले,डॉ के के गिल,डाॅ ए जे मुंगोले,प्रा.रुपेश वाकोडीकर ,पर्यवेक्षक प्रा आनंद भोयर व समिती सदस्यांनी सहकार्य केले.कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला.




