




🔺अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल
✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466
उमरखेड(दि.7मार्च):- तालुक्यातील साखरा या गावामध्ये दोन अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून पसार झालेल्या मुख्य आरोपीला तात्काळ अटक करून कडक शासन करण्यात यावे.याकरिता भीम टायगर सेना सामाजिक संघटनेच्या वतीने मागणी करण्यात आली आहे.सदर मुख्य आरोपी/नराधामाला 8 दिवसाच्या आत अटक करण्यात यावी.
अन्यथा भीम टायगर सेना शाखा उमरखेड तर्फे मा. दादासाहेब शेळके (राष्ट्रीय अध्यक्ष भीम टायगर सेना) यांच्या नेतृत्वात तीव्र आंदोलन छेडण्याचा येईल.असा इशारा उमरखेड उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब यांच्या कार्यालयात निवेदनाद्वारे देण्यात आला.यावेळी निवेदनकर्ते श्याम धुळे (जिल्हा कार्याध्यक्ष यवतमाळ) कैलास कदम (तालुका अध्यक्ष उमरखेड) सिद्धार्थ दिवेकर (शहराध्यक्ष उमरखेड), प्रफुल दिवेकर (सामाजिक कार्यकर्ते उमरखेड) नितीन आठवले, माही धुळेकर असे कार्यकर्ते उपस्थित होते.




