



८ मार्च ,जागतिक महिलादिन.खरे तर आजकाल अनेक दिन पाळले जातात.मग त्या त्या दिनानिमित्य अनेक कार्यक्रमांची रेलचेल असते.व्याख्यानं,सभा,संमेलनं,परिसंवाद वगैरे घेतले जातात.आणि सर्व तासदिडतासातच स्म्रुतीच्या पलिकडे जातं.कारण ती सर्व हारतुरे स्विकारुन बाेंबल्यात बाेंबलण्याची स्पर्धा असते.त्या दिनाविषयी फार काही गंभीरता राहात नाही.तेवढा एक काळ गेला की कार्यक्रमाचे आयाेजक,वक्ते आणि प्रेक्षक सर्व विसरतात.हाच आजवरचा अनुभव आहे.८ मार्च हा जागतिक महिलादिन आहे.म्हणून भारतीय समाज रचनेत स्त्रीयांचा सामाजिक दर्जा,काल,आज आणि ऊद्या असा विचार करुन बघू…आम्ही शाळेत जायचाे तेव्हा शुक्रवार आला की सरस्वती पुजन असायचं.त्यावेळी सरस्वती पुजनासाठी दर शुक्रवारी दहा पैसे,चार आणे,किंवा फार झालं तर पन्नास पैसे घरुन मिळायचे.त्यासाठी खुप हट्ट वगैरे करायची गरज नव्हती.कारण घरच्यांना माहीत असायचं की हे पैसे प्रसादासाठी वापरले जाणार.विद्देची देवी सरस्वती आहे हे घरच्यांना ठाऊक हाेतं.तीच माहिती आमच्याकडे हाेती.लक्ष्मी ही धन संपत्ती ची देवी,आणि सरस्वती विद्देची देवी एकत्र नांदत नाहीत,त्यांच हाड वैर आहे वगैरे कथा आमच्या कानावरुन गेल्यात.वय वाढलं तशी आकलनशक्ती वाढली.
वाचन वाढलं आणि आपन वेगळ्या भ्रमात हाेताे,किंवा त्यावेळी आपण किती मुर्ख हाेताे!वगैरे समजू लागलं.लक्ष्मी आणि सरस्वती एकत्र नांदत नाही हा समज खाेटा आहे.कारण शिक्षणाने(विद्येने)नाेकरी मिळते.आणि त्यामुळे दरमहा लक्ष्मी म्हणजे पैसा येताे.पगार य़ेताे.लक्ष्मी म्हणजे पैसा नाही.धन संपत्ती नाही.तसेच विद्या म्हणजे सरस्वती नाही.एकुणच शिक्षण आणि संपती यांचा लक्ष्मी आणि सरस्वतीशी कसलाही सबंध नाही.ही ब्राम्हणांची बनवाबनवी,पुराऩकथा आहे.लक्ष्मी आणि सरस्वती हे ब्राम्हणकल्पीत स्त्रीपात्र आहेत,या निर्णयाप्रत मी येऊन ठेपलाे. कुठल्यातरी कारणाने काही स्त्रीपात्र पुजास्थानी असले तरी वेदपुरान कालीन स्त्रीयांचा सामाजिक दर्जा अतिशय हीन स्वरूपाचा हाेता.सत्यवानाचा प्राण वापस मागणारी आणि त्यासाठी थेट यमदरबारी हजेरी लावणारी सावित्री आपणास माहित आहे.पण सावित्रीसाठी यमदरबारी हजेरी लावून तिचे प्राण वापस मागणारा सत्यवान वेदकाळात आणि पुराणकाळात सापडत नाही.नवर्याच्या चितेत ऊडी घेऊन बायकाेन जीवनयात्रा संपविण्याचा किळसवाना प्रकार,जीवाचा थरकाप ऊडविणारा प्रसंग वेद,पुरान आणि मनुस्म्रुती….च्या पानावर आपण वाचु शकताे.अशा लाेककथा आपन ऐकू शकताे.
पण बायकाेच्या चितेत उडी घेऊन जीवनयात्रा संपविणार्या नवर्याच्या नवलकथा आपल्या वाचऩ्यात आणि ऐकीव्यात नाहीत.स्म्रुती ग्रंथावर आधारीत “दायभाग” आणि ” मिताक्षरा”या दाेन्ही पद्धतींनी स्त्रीयांना न्याय हक्कांपासून वंचित केलं हाेतं.प्राैढ ईसमाशी अल्पवयीन मुलीच्या लग्नाला ब्राम्हण कायद्यांनी मान्यता दिली हाेती.पुरुषांच्या बहुविवाहाला मान्यता हाेती.आणि स्त्रीपुरुष समानतेला नकार हाेता.स्त्री फक्त भाेगवस्तू हा एकच न्याय ब्राम्हणी व्यवस्थेन मान्य केला हाेता.त्यामुळे तिच्या कार्यक्षेत्राला प्रचंड मर्यादा पडल्या हाेत्या.तिने हे करु नये तिने ते करु नये,ईथे जाउ नये तिथे जाऊ नये…वगैरे नानाविध बंधने तिच्यावर लादली गेली हाेती.चुल आणि मुल ही तिची चाैकट हाेती.यावर ईतरांनी आराेप प्रत्याराेप करण्याचा प्रश्नच नाही.कारण हा तर देव आणि मानव यांच्यात सबंध सांगणार्या ब्राम्हणांनी घालून दीलेला नियम हाेता.ब्राम्हणाच्या बनवाबनवीची वेदकालीन आणि पुराणकालीन,मनुस्म्रुतीकालीन अनेक ऊदाहरणे आपल्यापुढे ठेवता येतील.
जगभरात स्त्री स्वातंत्र्याच्या कल्पनांचे कितीही ढाेलनगारे वाजत असले तरी मलाला युसुफझाईला स्त्री शिक्षणासाठी संघर्ष करावा लागला.आणि परिणाम म्हणून तिला बंदुकीच्या गाेळ्या अंगावर झेलाव्या लागल्या.आणि म्रुत्युच्या महाद्वारातून ती परतलीय.स्त्रीशिक्षणासाठीचे हेच काम भारतात १८ व्या शतकात सावित्रीबाईंनी केले.तेव्हा शेण,माती ,दगड धाेंड्यांनी माईंना मारहाण करण्यात आली.पण मान अपमानाची पर्वा न करता त्यांनी आपलं काम अनवरत चालुच ठेवलं.एका माळ्याच्या पाेरीने परंपरावाद्यांना न घाबरता स्रीशिक्षणाची ज्याेत सतत तेवत ठेवली.ती आता जनमनात ” क्रांतीज्याेती ” सावित्रीबाई झाली,आई झाली.त्याचा परिणाम,दगड शेण,माती मारणार्या ब्राम्हणांच्या पाेरी आयपीएस,आयएएस अधिकारी झाल्या.. …सकाळी – रात्री टीव्हीचं बटन दाबलं की अर्धनग्न कपड्यांत कंबर हलवणार्या पाेरी दिसतात. त्याला डाँन्स म्हणतात. ही कुणाची संस्क्रुती हे तुम्हाला समजलं असेल. आपल्या माईंनी असं शिक्षण अशी संस्क्रुती दीली नाही म्हणुन बरं वाटतं. पण याच सावित्रीमाईंचा स्रीविषयक द्रुष्टीकाेन टीव्हीवर क्वचित मिनिट दाेन मिनिट दिसताे.त्याला सावित्रीमाईंवरील कार्यक्रम असं टीव्हीवालेच म्हणतात.
आणि य़ाच टीव्हीवर रमा रानडे नावाची स्री चमकते ती फार सुधाकणावादी वगैरे हाेती असं हेच टीव्हीवाले सांगतात.तिच्यावर मालिका येते.कधी चर्चासत्र घडवुन आणलं जातं.अशा वेळी जिथे काही पिकत नाही तेही टीव्हीवाले खमंग प्रसिद्घी देउन विकतात,हे माेठंच आश्चर्य आहे.पण त्यामुळे सावित्रीमाय कमी हाेऊ शकत नाही. जिच्या हाती पाळण्याची दाेरी ती जगाचा ऊद्धारी ही म्हण सर्वांना ठाऊक आहे. ती पुर्वी ज्या अर्थाने वापरली जायची तशीच आजही वापरली जाते आहे.मालेगाव बाँम्ब स्फाेटातील आराेपी प्रज्ञा ठाकुर हींदुंची संख्या वाढावी म्हणून स्त्रीयांनी अधिक मुले जन्माला घालावी,असं बरडली हाेती.जिने मुल जन्माला घातलं नाही,जिला प्रसववेदना झाल्या नाहीत तिने अशी विधानं करणं किती याेग्य? असा विचार स्रीयांनी करुन बघावा.स्त्री म्हणजे काय मुले जन्माला घालणारी फँक्ट्री आहे? यातुन परंपरावाद्यांचा स्रीविषयक द्रुष्टीकाेन स्पष्ट हाेताे.हा द्रुष्टीकाेन असल्याने त्यांचं मन सकारात्मक विचार करत नाही.त्यामुळे भगव्या वस्त्रातील महाराज(लाेक म्हणतात म्हणून) आणि साध्वी (लाेक म्हणतात म्हणून)केवल हिंदू धर्माची व्यापकता लक्षात यावी म्हणून,हा धर्म माेठा व्हावा म्हणून स्त्रीयांनी,चार दहा चाळीस मुले ज्न्माला घालावी असा आग्रह धरतात.आणि आधुनिक स्रियांयांच्या प्रगतीकडे डाेळेझाक करतात.आता या प्रयत्नांना,अशा भुलथापांना आपण बळी पडायचं नाही असा स्वतंत्र विचार किमान भारतीय स्त्रीयांनी करायला हवा.
कारण सावित्री माईंनी पुण्यात १८५१ ला पहिली मुलींची शाळा काढली आणि स्री स्वातंत्र्याला तिच्या शिक्षण आणि सर्वांगीन विकासाला मार्ग माेकळा करुन दीला.डाँक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात स्रीपुरुष समानतेचे तत्व बहाल केले.आज स्री केवल भाेगवस्तु राहीली नाही तिच्या सिमा रुंदावल्या आहेत.सर्वच क्षेत्रात स्री पुरुषांच्या बराेबरीने काम करते आहे.आणि अनेकदा ती पुरुषांपेक्षा सरस ठरते आहे.म्हणून जिच्या हाती पाळण्याची दाेरी ती जगाची ऊद्धारी ही म्हण आता कालबाह्य झाली आहे.आता” जिच्या हीती शिक्षणाची दाेरी ती जगाची ऊद्धारी “ही नवी म्हण व्हायला हवी.
भारतीय समाजरचना अतिशय विसंगत अशी आहे.ती बदलण्याचे प्रयत्न अनेक समाजसुधारक प्रयत्न करीत आलेत.त्यांच्या प्रयत्नांना मनापासुन वंदन.जागतिक महिला दिनाचा विचार करतांना मासाहेब जीजाऊ,सावित्रीमाई फुले आई रमाई आंबेडकर यांच्या स्मरणाशिवाय हा दिवस महत्वपुर्ण हाेऊ शकत नाही.ऊद्याचा देश बदलायचा असेल तर सावित्रीमाई फुलेंचा, मा जिजाऊंचा,माई रमाई आंबेडकरांचा आदर्श ईथल्या प्रत्येक स्रीने घ्यायला हवा.जागतिक महिला दिनाला या कर्तबगारीची झालर लावल्याशिवाय किमान आपल्या देशात जागतिक महीला दिनाला महत्व प्राप्त हाेणार नाही.जागतिक महिला दिनानिमित्य त्यांच्या कार्याला मनापासुन वंदन.आणि जागतिक महिला दिनाच्या आपणास आभाळभर शुभेच्छा🙏🙏
✒️लेखक:-राजू बाेरकर(मु पाे ता लाखांदुर,जि भंडारा)मो:-७५०७०२५४६७


