Home महाराष्ट्र अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला तात्काळ अटक करून कारवाई करा

अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला तात्काळ अटक करून कारवाई करा

108

🔹भीम आर्मी यवतमाळ जिल्हा अध्यक्ष अशोक भालेराव यांची मागणी.!

✒️सिद्धार्थ दिवेकर(विशेष प्रतिनिधी)

यवतमाळ(दि 7मार्च):-साखरा ता.उमरखेड येथील दोन अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून ३ दिवस लोटून गेले तरी मुख्य आरोपीला अटक गेली नाही व तो मोकाट फिरत असल्याने पीडित परिवाराला न्यायाची अपेक्षा असल्याने आज अशोक कांबळे राष्ट्रीय महासचिव भीम आर्मी,सीताराम गंगावने महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष,दीपक भालेराव मुख्य संघटक महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली व अशोक भालेराव जिल्हाध्यक्ष यवतमाळ जिल्हा यांच्या नेतृत्वाखाली आज भारत एकता मिशन यवतमाळ जिल्हा यांनी दोन्ही पीडित मुलींच्या परिवाराची भेट घेतली व सर्वतोपरी सहकार्य करण्याचें आश्वासन दिले.

तसेच पोलीस स्टेशन उमरखेड यांची भेट घेऊन मुख्य आरोपीस अटक करावी अशी मागणी गेली.तसेच या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता आज भीम आर्मी तर्फे उपविभागीय अधिकारी साहेब उमरखेड यांना निवेदन देण्यात आले.दोन्ही पीडित बालिकेच्या परिवाराला सुरक्षा देण्यात यावी व मुख्य आरोपीस ४ दिवसा मध्ये अटक न केल्यास भीम आर्मी महाराष्ट्र राज्य,यवतमाळ जिल्हा,तालुका,शाखा जिल्हाभर आंदोलन करेल व उदभवलेल्या परिणामास सर्वस्व पोलीस प्रशासन यवतमाळ,उमरखेड जबाबदार राहील.!यावेळी अशोक भालेराव जिल्हाध्यक्ष भीम आर्मी यवतमाळ जिल्हा,धनराज कांबळे मुख्य महासचिव,पत्रकार राजेश ढोले,श्याम देवकुळे जिल्हा उपाध्यक्ष,अजय लोखंडे पुसद तालुका उपाध्यक्ष व असंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

Previous articleजागतिक महिला दिन
Next articleजिच्या हाती शिक्षणाची दाेरी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here