



✒️पंकज रामटेके(घुग्घुस प्रतिनिधी)
घुग्घुस(दि.7मार्च):-दिनांक ४ मार्च २०२२ रोजी घुग्घुस पोलिसांनी फरार आरोपी लोमेश दयानंद मडावी (४०) वर्ष रा. पिंपरी दीक्षित ता. मुल जिल्हा चंद्रपूर यास अटक केली व चोरीस गेलेला मुद्देमाल स्प्लेंडर दुचाकी एम.एच. ३४ ए.झेड. ८७७२ किंमत ३० हजार जप्त केला.दिनांक २५ नोव्हेंबर २०२१ रोजी बालाजी लॉन घुग्घुस येथून स्प्लेंडर दुचाकी क्र. एम.एच ३४ ए.झेड ८७७२ किंमत ३० हजार चोरीस गेली होती.फिर्यादीच्या तक्रारीवरून दिनांक २८ नोव्हेंबर २०२१ रोजी घुग्घुस पोलिसांनी कलम ३७९ भांदवी गुन्हा दाखल केला.
चार महिन्यापासून आरोपी फरार होता पोलिसांनी तपासचक्र फिरवून आरोपीस अटक करून चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त केला. अखेर चार महिन्यापासून फरार आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकला. आरोपीस दिनांक ४ मार्च २०२२ रोजी ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणी केली असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अयोग्य अभिप्राय दिल्याने सदर आरोपीस कलम ४१(अ) १ जाफौ प्रमाणे सुचनापत्र देऊन त्याच्या नातेवाईकाच्या ताब्यात देण्यात आले.ही कारवाई घुग्घुस पोलीस निरीक्षक बी.आर. पुसाटे यांच्या मार्गदर्शनात आमटे, मनोज धकाते, प्रकाश करमे, रंजित भुरसे, महेंद्र वन्नकवार, रवी वाभीटकर, ज्ञानेश्वर जाधव यांनी केली.


