Home महाराष्ट्र शिल्पा सारखेच आपल्या भाग्याचे शिल्पकार बना- आ.सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन

शिल्पा सारखेच आपल्या भाग्याचे शिल्पकार बना- आ.सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन

119

✒️पंकज रामटेके(घुग्घुस प्रतिनिधी)

घुग्घुस(दि.6मार्च):-जगातील प्रत्येक व्यक्ती वैशिष्ट्यपूर्ण आहे.मनुष्य ईश्वराची-निसर्गाची रहस्यमय अद्भुत कलाकृती आहे.आपल्यातील कलागुण ओळखता आले पाहिजे.त्या कलेला आत्मविश्वासाने विकसित केले तर चमत्कार होतो.या साठी जिद्द चिकाटी हवी.ही जिद्द,चिकाटी व आत्मविश्वास शिल्पा आडम (शिल्पा चिंतावार)यांच्यात होती म्हणून त्या एक वर्षाच्या परिश्रमानंतर मिसेस इंडिया 2021 या पुरस्काराच्या विजेत्या ठरल्या.

शिल्पा आपल्या भाग्याची शिल्पकार बनली,तुम्ही पण शिल्पा सारखेच भाग्याचे शिल्पकार बना,असे प्रतिपादन विधिमंडळ लोकलेखा समिती अध्यक्ष,माजी वित्तमंत्री आ.सुधीर मुनगंटीवार यांनी केले.ते भाजपा जनसम्पर्क कार्यालय येथे महानगर भाजपा तर्फे जागतिक महिलादिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित मिसेस इंडिया 2021पुरस्कार विजेत्या सौ शिल्पा आडम यांचा सत्कार कार्यक्रमात रविवार(6मार्च)ला कार्यकर्त्यांशी संवाद साधतांना बोलत होते.
यावेळी भाजपा महानगर जिल्हाअध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे,संघटन महामंत्री राजेंद्र गांधी,महापौर राखी कंचर्लावार,उपमहापौर राहुल पावडे,महामंत्री सुभाष कासनगोट्टूवार,रवींद्र गुणिले,कोषाध्यक्ष प्रकाश धारणे,महिला मोर्चा अध्यक्ष अंजली घोटेकर,आत्मनिर्भर भारत जिल्हाध्यक्ष किरण बुटले,रवी लोणकर,अरुण तिखे,रितेश वर्मा,रामकुमार अकापेलीवार आदींची उपस्थिती होती.
यावेळी शिल्पा आडम यांचा बांबू पासून निर्मित तिरंगा ध्वज आ.मुनगंटीवार यांचे हस्ते प्रदान करून सत्कार करण्यात आला.तर प्रकाश धारणे यांनी सिंहावलोकन पुस्तिका देऊन,शिल्पा आडम यांना आ.मुनगंटीवार यांच्या विकासकार्याचा परिचय करून दिला.
2022 मध्ये अमेरिकेतील मायामी येथे होणाऱ्या मिसेस वर्ल्ड 2022 या स्पर्धेसाठी शिल्पा भारताचे नेतृत्व करणार आहे.आपल्या आत्मविश्वासाच्या बळावर ती विजयी होईल,असा विश्वास आ.मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.कार्यक्रमाला मोठ्या संख्येने भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

*साधारण महिला पण उंची गाठू शकते*

आत्मविश्वास,इच्छाशक्ती व जिद्द हे यशाचे सूत्र आहे.स्वबळावर कोणतीही मातृशक्ती हिमालयाची उंची गाठू शकते.आपले स्वप्न सजीव असावे.फक्त पंख राहून चालणार नाही,तर प्रबळ इच्छाशक्तीनेच उंच भरारी घेता येते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here