Home महाराष्ट्र भारतीय युक्रेन मध्ये का अडकले?

भारतीय युक्रेन मध्ये का अडकले?

142

भारतीय युक्रेन मध्ये का बरे अडकलेले ?बरं जे त्या देशात अडकले ते कुणी उद्योगधंद्यासाठी व्यापारासाठी किंवा नोकरीसाठी गेलेले नव्हते सर्व भारतीय विद्यार्थीच अडकले होते व आहेत. भारतीय विद्यार्थ्यांना युक्रेन रशिया चीन मध्ये जाऊन शिक्षण का घ्यावे लागते? याचे कारण पण कोणी शोधले का? यापूर्वी अर्थव्यवस्थेवर आणि अर्थसंकल्पावर ती एक लेख लिहिला होता त्या लेखामध्ये स्पष्ट म्हटले होते गेली वीस वर्ष भारतीय अर्थसंकल्प हा शिक्षणावर ती फक्त दोन टक्के खर्च करतो वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी आपल्याकडे डॉक्टरला एक कोटी रुपये इतका खर्च येतो तोच खर्च पंधरा ते वीस लाखांमध्ये रशिया मध्ये येतो .भारतातील मुले परदेशात जाऊन तेथे वैद्यकीय शिक्षण घेतात या विद्यार्थ्यांना भारतातच शिक्षण मिळालं तर ही मुले परदेशामध्ये शिक्षणासाठी कशासाठी जातिल? भारतीय अर्थसंकल्पामध्ये शिक्षणासाठी जास्त प्रमाणामध्ये तजवीज केली पाहिजे असं का बरं वाटत नाही आपल्या राज्यकर्त्यांना.

गेला बाजार आयुर्वेद शिक्षण घेण्यासाठी सुद्धा आपल्याकडे पन्नास लाख रुपये पर्यंत खर्च येतो. शिवाय परदेशात शिक्षण घेतलेली मुले भारतात परत येतील आणि भारतीय जनतेची सेवा करतील अशी अपेक्षा करणे सुद्धा चुकीचे आहे. कारण आज भारतातील भ्रष्टाचार महागाई आणि अनपड गवार संस्थानिक लोकप्रतिनिधी भारतीय विद्यार्थ्यांचा सन्मान करतील का? साधं उदाहरण द्यायचं झालं तर महानगरपालिकेमध्ये असलेल्या एमबीबीएस डॉक्टरलाअनपढ गाव गुंड नगरसेवक फोन करून सांगतो आमच्या कार्यकर्त्याला आजाराचे खोटे सर्टिफिकेट द्या त्याला रजा पाहिजे माझ्या निवडणूक प्रचारासाठी .कलेक्टर ला फोन करून अंगुठाछाप खासदार सांगतो अमुक एक काम करा. मला हेच आश्चर्य वाटतं एवढं भरपूर शिक्षण घेऊन आय सी एस आय पी एस अधिकारी आणि डॉक्टर अशा अनाडी असंस्कृत गाव गुंड राजकीय नेत्यांचे कसं काय ऐकतात आणि त्यांना निवडून देणारे सुशिक्षित म्हणवणारे मतदार त्यांच्या झोळीत एवढी मते कशी काय टाकतात ?

जुने संस्थानिक राजे गेले आणि नवीन संस्थानिक राजे लोकशाहीच्या नावाखाली तयार झाले मग उच्च शिक्षण घेऊन ते ही भारतात परवडत नाही म्हणून परदेशात घेऊन परदेशात जर अशी शिकलेली मुले गेली तर त्यात वावगे ते काय आणि जर ही चित्र बदलायचं असेल तर आपल्या देशात वैद्यकीय महाविद्यालय भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये वाढवली पाहिजेत नाहीतर कोरोना सारखा एकदा आजार आल्यानंतर आपल्या देशात वैद्यकीय सुविधा देणारे डॉक्टर कमी पडतील याची नोंद घेऊन अजुनही वेळ गेली नाही वैद्यकीय महाविद्यालय शिक्षण कमीत कमी फी मध्ये उपलब्ध व्हायला पाहिजे जे जे मध्यमवर्गीयांना परवडेल अशा पद्धतीने शिक्षण सहज उपलब्ध व्हायला पाहिजे हा विषय फक्त वैद्यकीय शिक्षण पुरता मर्यादित नसून वकील अभियंता प्राचार्य आर्किटेक सर्व क्षेत्रातील शिक्षण हे मध्यमवर्गीयांना परवडेल अशा पद्धतीने व्हायला पाहिजे.

युक्रेनमध्ये मारला गेलेला एक विद्यार्थी त्याच्याबद्दल मला पूर्ण सहानुभूती वाटते त्याच्या वडिलांच्या नावाने एक मेसेज सध्या व्हायरल होत आहे म्हणे 97% त्याला मार्क्स मिळाले होते परंतु त्याला आरक्षण नसल्यामुळे त्याला वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी परदेशात जावे लागले. हे पण साफ चुकीचे आहे सरकारी मेडिकल आरक्षण ओपन साठी 85% वरती गेली दहा वर्ष बंद होत आहे आणि तसे असताना या विद्यार्थ्यांना 97 टक्के मार्क असून त्याला भारतात वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश का मिळाला नाही असे खोटे संदेश पाठवून आरक्षणामुळे त्या मुलाचा बळी गेला असे खोटे संदेश पसरून समाजामध्ये आणखीन तेढ निर्माण करणाऱ्या महा भागांचा ताबडतोब बंदोबस्त करणे गरजेचे आहे .आरक्षण ही काळाची गरज असून ओबीसी मागास वर्गिय समाजातील सर्वांना आरक्षण मिळालेच पाहिजे अन्यथा डॉक्टर वकील इंजिनियर एका ठराविक वर्गाची मक्तेदारी होऊन जाईल याचा विचार कोणी केला का? तानी चित्रपट पाहताना एका रिक्षावाल्याची मुलगी कलेक्टर होते हे दाखवलं जातं परंतु कलेक्टर झाल्यानंतर काम अनपड गाव गुंड खासदार आमदारांच्या इशाऱ्यावर करते हे पण दाखवा म्हणजे लोकांमध्ये जागृती निर्माण होईल .

भारतात भ्रष्टाचाराचे मूळ निज धर्माचा विसर आहे .आपले कर्तव्य नीट समजले नाही त्यामुळेच हा घोळ होत आहे. प्रत्येक जण आपल्या या कर्तव्याला विसरला आहे मतदार मतदान करताना कोणता उमेदवार जास्त पैसे देतो त्याला मतदान करत आहे जो जास्त पैसे देतो तो ते पैसे मतदारांच्या खिशातून अलगद पणे कसे काढत असतो हे पण लोकांच्या लक्षात येत नाही त्यामुळे कपाळकरंटे लोकप्रतिनिधी आपण निवडून देत आहोत स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात सुद्धा आपण पुरेशी वैद्यकीय महाविद्यालय निर्माण करू शकलो नाही. किमान भारतातील प्रत्येक जिल्ह्याला दोन वैद्यकीय महाविद्यालयांची गरज आहे .तसेच एका सुसज्य इस्पितळाची गरज आहे आणि त्या इस्पितळात लागणारा कर्मचारी वर्ग याची गरज आहे याची जाणीव प्रत्येक खासदाराला असली पाहिजे. आज भारताच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये विचार केलं तर वैद्यकीय सुविधा पाच टक्के सुद्धा उपलब्ध नाही आणि त्याचे कारण शिक्षणावर होत असलेला आणि वैद्यकीय खर्चावर होत असलेला अर्थसंकल्पातील 2% हा नीधी नगण्य आहे याचे भान प्रत्येकाने ठेवले पाहिजे तरच उद्या सकाळी एखादा कोरोना सारखा गंभीर आजार भारतामध्ये आला त्याला आपण निकराने लढा देऊ शकतो हे मी पुन्हा पुन्हा नमुद करतो.

कोणत्याही आजाराचे मूळ हे शोधल्याशिवाय त्यावर केला जाणारा उपचार हा व्यर्थ असतो त्याच प्रमाणे या लेखाची सुरुवात भारतीय युक्रेनमध्ये का अडकले वते विद्यार्थीच काढले त्यांच्या विरोधात येणाऱ्या पोस्ट पाहून ला पोस्ट लिहिणाऱ्या आणि ते फॉरवर्ड करणार्‍यांची कीव वाटते आई जेवू घालीना आणि बाप भीक मागू देईना अशी अवस्था शिक्षण व्यवस्थेची झालेली आहे म्हणून विद्यार्थी परदेशात शिकायला जात आहे हौस मौज करण्यासाठी जात नाही आणि तेवढे शिक्षण घेऊन आल्यानंतर जर भारतात प्रॅक्टिस करायचे असेल तर त्यांना पुन्हा भारतामध्ये एक परीक्षा द्यावी लागते याच्यासारखा दुर्दैवी लास कुठेही बघायला मिळणार नाही. यापुढे युक्रेनमध्ये शिकायला गेलेल्या विद्यार्थ्यांनी च्या विरोधात एकही पोस्ट पाठवू नका अशी हात जोडून कळकळीची नम्र विनंती आहे त्यांचेही पालक तुमच्यासारखा आमच्यासारखे आहेत याची जाणीव ठेवा. कोणत्या आई-वडिलांना आपलं मूल आपल्यापासून खूप लांब गेलेला आवडत? पण नाईलाज असतो शिक्षणासाठी आपल्या भारतीय परंपरेत राजा महाराजांची मुले सुद्धा गुरुकुला मध्ये शिक्षणासाठी बाहेर जात होती व आजही बाहेर जात आहेत भगवान कृष्ण सुद्धा सांदि पानी ऋषींकडे आणि प्रभु रामचंद्र वशिष्ठ ॠषी शिक्षणासाठी गेले होते याची आठवण ठेवा. परदेशात गेलेले सर्व विद्यार्थी सुखरूप पणे भारतात येउदे .युक्रेन वर आलेले संकट लवकरच दुर होऊन दे आणि सर्वांचे मंगल कल्याण होऊदे असे सांगून या लेखाची सांगता करतो .लेख आवडला तर पूर्वपरवानगीशिवाय छापण्यासाठी फॉरवर्ड करण्यासाठी आणि भाषांतरित करण्यासाठी कोणतीही परवानगी ची गरज नाही .

✒️लेखक:-सुरेंद्र हरिश्‍चंद्र नेमळेकर(९४०४१३५६१९)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here