




✒️मोहोळ,तालुका प्रतिनिधी(नानासाहेब ननवरे)
कुरुल(दि.6मार्च):- प्रहारचे जिल्हा अध्यक्ष दत्ता भाऊ मस्के पाटील, शहर अध्यक्ष अजित भाऊ कुलकर्णी, युवा जिल्हा अध्यक्ष संतोष पवारसर,महिला जिल्हा अध्यक्ष आश्र्विनी ताई पाटील अपंग क्रांतीचे जिल्हा उपाध्यक्ष सिद्राया माळी यांच्या मार्गदर्शनाखाली 10 मार्च रोजी आंदोलन करणार आहे.असे प्रहार जनशक्ती पक्ष मंगळवेढा तालुका अध्यक्ष राजकुमार स्वामी यांनी इशारा देण्यात आला आहे.मंगळवेढा तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्याच्या शिक्षणासाठी बस सेवा सुरू करा.कोरोणामुळे तसेच आपल्या कर्मचार्यांच्या संपामुळे विद्यार्थ्यांचे अगोदरच नुकसान झाले आहे. आता 10 व 12 वी चे पेपर ही सुरू होतील तसेच शाळा सुध्दा जेमतेम दीड महिना राहिलेली आहे.त्यामुळे त्वरित बस सेवा सुरू करावी.आता सध्या मंगळवेढा आगारातून सध्या 7 बसेस सोडण्यात येतात त्यामध्ये सोलापूर साठी 3 पंढरपूर साठी 2 व पुणे साठी 2 बसेस सोडल्या जातात. मात्र ग्रामीण भागात एक ही बस सुरू करण्यात आलेली नाही.
मंगळवेढा तालुक्यातील ग्रामीण भागातील बरेच लोक ऊस तोडी करून तसेच इतर कष्टाची कामे कामे करून आपल्या मुलांना शाळा शिकवत असतात.त्यांच्या मुलांनी चांगल शिक्षण घ्याव कुठेतरी चांगली नोकरी मिळवावी यासाठी ते मर मर मरतात.आज ग्रामीण भागात मुले रस्त्याने जाणाऱ्या टू व्हीलर गाड्यांना हात करून, रिक्षाने, टमटम,टेम्पो तसेच कारखान्यातून रिकामे होऊन आलेल्या टॅक्टरच्या ट्रोलीत बसून मुले शाळेला येतात जर त्यांचं काय बर वाईट झालं तर त्यास आगर प्रमुखांना आम्ही जबाबदार धरणार आहोत.
जर ग्रामीण भागात बस सेवा सुरू केली नाही तर येत्या 10 तारखेला मंगळवेढा आगारात सर्व नागरिकांना, शेतकऱ्यांना, विद्यार्थ्यांना, तसेच त्यांच्या पालकांना तसेच प्रहारच्या कार्यकर्त्यांना घेऊन आंदोलन करणार असल्याचा इशारा प्रहारच्या वतीने देण्यात आला यावेळी प्रहारचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख राजेंद्र सावंत, कार्याध्यक्ष अमोगसिद्ध काकणकी, रुग्णसेवक सिद्धेश्वर पाटील , विभाग प्रमुख नवनाथ शिरसटकर, महेश तळे,राजकुमार स्वामी तसेच इतर कार्यकर्ते उपस्थित होते




