Home महाराष्ट्र गंगाखेड शहरची वाटचाल ‘खड्डेमुक्ती’कडे

गंगाखेड शहरची वाटचाल ‘खड्डेमुक्ती’कडे

160

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.6मार्च):-नगर परिषद बहुचर्चित’ नऊ कोटींच्या विकासपुर्तीने गंगाखेड शहराची वाटचाल ‘खड्डेमुक्ती’कडे होताना दिसते तसेच शहराचा मुख्य रस्त्याचे कामही पाईपलाईनची जागा सोडून सुरू करण्याच्या हालचाली होताना दिसत आहे. गंगाखेड नगरपरिषद चे नगराध्यक्ष विजयकुमार तापडिया यांच्या पुढाकारातून सुरू असलेल्या विकासकामांच्या अडचणी आल्या असता त्या वर मात करून बहुतांश कामे पुर्णत्वास आल्याने शहर विकासाची वाटचाल ‘खड्डेमुक्ती’ कडे होत आहे. शहराचा मुख्य रस्ता मात्र त्यास अपवाद ठरला असला तरी यातही लवकरच मार्ग काढला जाईल व काम सुरू होईल असे माहिती मुख्याधिकारी देविदास जाधव यांनी दिली आहे. 

नगराध्यक्ष विजयकुमार तापडिया यांनी आपल्या कार्यकाळात गंगाखेड शहरातून जाणाऱ्या हायवेला प्रमुख मार्गांनी जोडण्याचे तसेच मुख्य बाजारपेठेतील रस्त्यांचे कामे हाती घेतले. ई-टेंडरिंग मध्ये स्पर्धा होऊन न्यायालयीन वादविवाद, नाट्यमय राजकीय घडामोडी, बॅनरबाजी तसेच आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींनी ही नऊ कोटींची विकासकामे चांगलीच गाजली. मात्र न्यायालयाने नगराध्यक्षांना दिलासा देत मुख्याधिकारी देविदास जाधव यांना याप्रश्नी सर्वाधिकार प्रदान करत विकासकामे सुरू करण्याचा मार्ग खुला करून दिला. याकामी परभणीचे खासदार संजय जाधव यांची भूमिका निर्णायक व परिणामकारक ठरल  अखेर नगराध्यक्ष तापडिया व मुख्याधिकारी देविदास जाधव यांच्या मार्गदर्शनात संबंधित सर्व कामे पूर्णत्वास येत आहेत.

यामध्ये कोद्री रोड ते संत भगवानबाबा मंदिरपर्यंत सीसी रोड व नाली बांधकाम, कोद्री रोड ते जनाबाई नगरपर्यंत मुख्य रस्ता व नाली बांधकाम, बसस्थानक ते दिलकश चौक मार्गे मोठा मारुती मंदिर हॉटमिक्स रस्ता व नाली बांधकाम, परभणी रोड ते मस्के यांचे घर भाग्य नगर मधून जाणारा सीसी रस्ता, परभणी रोड ते डॉक्टर लेनला जोडणारा सीसी ड्रेन, परळी रोड ते अक्सा मस्जिद हॉटमिक्स रस्ता, श्रीराम चौक ते भगवती मंदिरापर्यंत पेवर ब्लॉक रस्ता ही ७ कामे पूर्णत्वास आली असून उर्वरित डॉ.आंबेडकर पुतळा ते दिलकश चौका पर्यंतच्या हॉटमिक्स व पाईपलाईनचे काम शिल्लक आहे.

       पाईपलाईनचे कामात मात्र कंत्राटदार एजन्सीला तांत्रिक अडचण येत असल्यामुळे विलंब होत असल्याची प्रशासकीय माहिती आहे. मुख्याधिकारी देविदास जाधव म्हणाले की, मुख्य रस्त्याचा प्रश्न लवकर सोडवण्यासाठी नगर पालिका प्रशासन पाईपलाईनचे काम वगळता व त्यासाठीची जागा सोडून मुख्य रस्त्याचे काम सुरू करण्याचे अंतिम विचारात असून लवकरात लवकर हा रस्ताही पूर्ण करण्यात येईल असे त्यांनी सांगितले

      एकंदरीतच बहुचर्चित नऊ कोटींच्या आठ विकास कामापैकी सात विकास कामे आजरोजीपर्यंत पूर्णत्वास येत असून मुख्य रस्त्याच्या कामाचाही तांत्रिक मार्ग काढून हा रस्ता लवकरच सुरू होणार असल्याने शहराची वाटचाल आता ‘खड्डेमुक्ती’कडे होत असल्याचे एकंदरीत सकारात्मक चित्र समोर येत आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here