Home महाराष्ट्र म्हसवड नंबर १ विकास सोसायटीत राजेमाने पॅनेलने १३ -० ने आ गोरे...

म्हसवड नंबर १ विकास सोसायटीत राजेमाने पॅनेलने १३ -० ने आ गोरे गटाला धोबीपछाड

84

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.6मार्च):- म्हसवड विकास सेवा सोसायटी नंबर १ च्या आज झालेल्या चुरशीच्या व अटीतटीच्या लढती मध्ये राजेमाने पॅनेलने आ जयकुमार गोरे गटाच्या सिध्दनाथ शेतकरी विकास पॅनेलचे प्रमुख पालिकेचे गट नेते धनाजी माने यांच्या गटाचा एक हि सदस्य निवडून आला नाही जवळ जवळ २५० मताच्या फरकाने राजेमाने पॅनेलने विजय मिळवत १३-० करुन आ. गोरे गटाला जबरदस्त हादरा दिला व जातीची समीकरणे मतदारांच्या माथी मारुन जातीवर निवडणुका जिंकण्याचा डाव मतदारांनाच हाणुन पाडत ५२ वर्षापासून सभासदांच हित जोपासण्याचे काम करणारे श्रीमंत अजितराव राजेमाने यांच्यावर प्रेम करणार्या सोसायटीच्या मतदारांनी पुन्हा एकदा राजेमाने घराण्यावर विश्वास दाखवून विरोधकांचे मनसुबे धुळीला मिळवले.

माणच्या राजकारणात म्हसवड हेच राजकारणाचा केंद्र बिंदू आज पर्यंत ठरत आला आसुन म्हसवडचे राजकारण तालुक्याला दिशा देते म्हसवडकरनी एकदासी ठरवलं कि त्याचं काम पक्ष गट तट बाजूला ठेवून म्हसवडकरनी आज पर्यंत केले हे अनेक राजकारणी नेत्यांनी आनुभवल आहे ” जो नाथ महाराजांचा गुलाल डावात त्यांला म्हसवडकर डावलतात” जाती जातीत वाद पेठवून जातीच्या राजकारणाच्या तव्यावर आपली भाकरी भाजणार्या विरोधकांना सोसायटी नंबर१ च्या निवडणुकीत जागा दाखवली विकास सेवा सोसायटी नंबर १ च्या निवडणुकीचे आर्ज दाखल करताना जातीच्या राजकारणाचा वास परिसरात दरवळत असताना दामाजी पंतांचा मोठा गवगवा सुरु होता सोसायटीच्या ५२ वर्षाच्या कारकिर्दीत ५० वेळा हि सोसायटी बिनविरोध झाली होती या काळात श्रीमंत अजितराव राजेमाने बापू यांचे नेतृत्वावर विश्वास ठेवून सोसायटी चालवली असल्याने यापूर्वी १९९२ साली संस्थापक अध्यक्ष श्रीमंत अजितराव राजेमाने यांना विरोध विलासराव माने यांनी करुन पहिल्यांदा सोसायटीची निवडणूक लावली होती.

दोन माजी नगराध्यक्ष या निवडणुकी मुळे समोरा समोर आले होते मात्र त्यावेळी हि विरोधकांना खाते हि उघडता आले नाही आणि आज दुसर्यांदा हि विरोधकांना त्याच ताकतीने अजितराव राजेमाने यांनी वयाच्या ८५ वर्षे हि विरोधकांना धोबीपछाड देत एकहाती सत्ता मिळवत विरोधकांना धुळ चारत २५० ते २०० मता फरकाने राजेमाने पॅनेलचे सर्व उमेदवार विजयी करुन स्वतः अजितराव राजेमाने यांनी सर्वात जास्त २९० मते घेऊन विजय मिळवला तर त्यांच्या विजयी उमेदवार व पडलेली मते या प्रमाणे महिला राखीव मधून शोभा कलढोणे २७५, ताई बाबर २६७. भटक्या विमुक्त जाती लिंगाप्पा सारुख २८९, अनुसूचित जाती जमाती शिवाजी २९२ . सर्वसाधारण मतदार संघातुन अजितराव राजेमाने २९०, तेजसिंह राजेमाने २८९,प्रतापसिंह राजेमाने २७५, श्रीमंत मासाळ २६७, बाबासाहेब माने २५६,दादा पाटील २६२,हणमंत जगताप २६६ व मोतीराम शिर्के २४८ सत्ताधारी राजेमाने पॅनेलला पडलेली हि मते तर विरोधी आ. जयकुमार गोरे गटाच्या सिध्दनाथ शेतकरी विकास पॅनेलचे प्रमुख व या पॅनेलची सर्व धुरा खांद्यावर घेऊन एकट्याने खिंड लढवणारे धनाजी माने यांना १३२,राजाराम मासाळ १२५, गुलाब शिर्के १७७, गंगाराम विरकर १२०,सुरेश लिंगे ११६, कोडलकर १२८, मधुकर सोनवणे ११६ सौ ठोंबरे १९२, सौ विरकर १२८ . अशी विरोधकांना मते पडली तर सत्ताधारी राजेमाने पॅनेलच्या सर्व उमेदवारांना मात्र २०० ते २५० मताची आघाडी घेत विजय श्री खेचून आणला या निवडणुकीत ५४६ एकूण मतदार होते यापैकी मयत व बाहेर गावी असलेले १२० मते झाली नाहीत ४२६ मतदान झाले टक्के मतदान झाले

या निवडणुकीसाठी अजितराव राजेमाने यांचे चिरंजीव दिपसिंह राजेमाने , तेजसिंह राजेमाने,सह बाळासाहेब राजेमाने, पृथ्वीराज राजेमाने , , युवराज सुर्यवंशी, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष बाबासाहेब माने, इंजि. बाळासाहेब माने, कैलास भोरे, शिवसेना शहराध्यक्ष राहुल मंगरुळे,शहाजी लोखंडे,,संभाजी माने, राजेंद्र इंगवले, राहुल म्हेत्रे, बापूसाहेब मासाळ,जिनदास खडके, संभाजी मासाळ, शिवाजी विरकर, लिंगाप्पा सारुख,शांताराम माने, महादेव मासाळ, नारायण मासाळ, मधुकर आबदागिरे, बाळासाहेब कलढोणे,प्रभाकर शिंदे, पिंटू लिंगे, राजू कलढोणे, विलास रुपनवर, भिकू झपाटे, बापू बाबर, सचिन राजमाने , प्रथमेश शेटे, अभिराज नागमला आदीनी विजयासाठी प्रयत्न केले.श्रीमंत अजितराव राजेमाने म्हणाले या सोसायटीच्या निवडणुकीत जाती पातीचे राजकारण उफाळून आले होते या सोसायटीत कधी ही बापूनी जातीच्या राजकारणाला थारा दिला नव्हता आज पर्यात सर्वाच्या विचाराने संचालक निवडत होतें यावेळी हि तसाच हालचाली सुरू होत्या बिनविरोध करण्यात सर्वाचे एकमत हि झाले मात्र मला विरोध करायचा म्हणून वैयक्तिक स्वार्थासाठी पोटी विरोधकांनी निवडणुक लावली मात्र म्हसवडचा सुज्ञमतदार यांनी हा त्यांचा डाव धुळीला मिळवत त्यांच्या मनसुब्यावर पाणी फेकले व त्यांची जागा त्यांना दाखवली मतदारांनी जो माझ्यावर व राजेमाने पॅनेल वर विश्वास दाखवून मतदान केले त्याबद्दल सर्व मतदारांचे मनपूर्वक आभार असे…

यावेळी युवराज सुर्यवंशी म्हणाले सोसायटीच्या निवडणुकी निमित्त विरोधकांनी जातीचे राजकारण करुन मतदारांना भडकवण्याच्या प्रयत्न श्रीमंत अजितराज राजेमाने बापू यांनी उधळून लावत पुन्हा एकहाती नेतृत्व सिद्ध केले बाजूच्या नेतृत्वावर सर्व मतदारांनी विश्वास दाखवला बापूच्या साठी म्हसवड शहर व परिसरातील विविध पक्षाचे नेते एकत्र दुसऱ्यांदा आल्याचे चित्र दिसत होते राष्ट्रवादी पक्षा बरोबर, राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, शिवसेना,आदी पक्षाचे पदाधिकारी प्रचारात उतरले होते आगामी सोसायट्या व पालिकेच्या निवडणुकीत हि पूर्ण ताकतीने आघाडीच्या माध्यमातून लढवणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवराज सुर्यवंशी यांनी सांगितले.सोसायटी नंबर १ च्या निवडणुकीत सर्वसाधारण मतदार संघातून राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे माण तालुका अध्यक्ष असलेले पै. बाबासाहेब माने हे उभे होते त्यांच्या प्रचारात पक्षाचा एकमेव पदाधिकारी गब्बर काझी फक्त दिसत होते पायलीचे पंच्चावन्न पदाधिकारी म्हसवड मध्ये असताना प्रकारापासून सर्व लांब का होते काही जन तर त्यांच्या पराभवासाठी विरोधी गटाने जोर लावला होता पण त्यांच्याच काँग्रेस पक्षातून त्यांच्या पराभवासाठी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उतरले असल्याचे बोलले जात होते

Previous article“सम्राट अशोका इतका महान राजा जगाच्या इतिहासात नाहीच” – प्रो. डॉ .अनिल काळबांडे
Next articleउदाहरणार्थ निर्मित या निर्मिती संस्थेच्या ८ दोन ७५ चित्रपटाला” ५० हून अधिक राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय पुरस्कार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here