



✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ)मो:-9823995455
उमरखेड(दि.5 मार्च):-भारतीय उपखंडाचा सम्राट असलेला आपले सगळे राज् वैभव सोडून मानवी कल्याणासाठी आपलं संपूर्ण जीवन व्यतीत करतो.आजचा नेपाळ ,बांगलादेश, संपूर्ण भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान पर्यंतचा सगळ्या प्रदेशावर ज्याचे एक छत्र राज्य होते.ज्यांनी जवळपास तेवीस विश्व विद्यापीठाची स्थापना करून जगभरातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची दारे खुली केली.
ज्यांच्या काळाला इतिहासकार भारत देशाचा सुवर्णकाळ म्हणतात असा सम्राट अशोका इतका महान राजा विश्वाच्या इतिहासात झालाच नसल्याचे प्रतिपादन प्रो. डॉ .अनिल काळबांडे यांनी केले.ते स्थानिक सुमेध बोधी विहारांमध्ये आयोजित सम्राट अशोक यांच्या जयंती निमित्त कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते.या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून नगरसेवक गजेंद्र ठाकरे विधीतज्ञ शिवाजी वानखेडे , लक्ष्मण हापसे, वीरेंद्र खंदारे, उत्तम शिगणकर जयभीम लोने, विश्वंभर भुक्तारे, राजाराम धुळे आत्माराम हापसे, डॉ.नंदकुमार कांबळे, सचिव भीमराव सोनुले सह शारदा निथळे, मनोरमा भरणे, प्रतिभा सोनुले, रंजना आळणे, आराध्या दामोदर उपस्थित होते.
सुरुवातीला सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्या वतीने सामूहिक त्रिशरण सह पंचशील प्रदान करण्यात आले.यावेळी अँड वानखेडे यांनी ,सम्राट अशोक यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेतला.तर वीरेंद्र खंदारे यांनी सुद्धा सम्राट अशोक यांच्या धर्म कार्याचा गौरव करीत त्यांचे धम्मातील योगदान या विषयावर मार्गदर्शन केले.आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. काळबांडे म्हणाले, सम्राट अशोक यांचे आपल्या देशाने त्यांच्या कार्याचा गौरव करतात.भारताच्या ध्वजावर त्यांचे अशोक चक्र, देशाचे राष्ट्रीय प्रतीक चार मुखी सिंह, राष्ट्रीय वचन सत्यमेव जयते, त्याचबरोबर भारतीय सैनिकांना देण्यात येणारा सर्वात मोठा पुरस्कार अशोक चक्र देऊन सम्राट अशोकाच्या कार्याला कायम चअभिवादन केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. गजानन दामोदर यांनी तर आभार संतोष निथळे यांनी मानले.


