Home महाराष्ट्र अर्हम फाऊंडेशन व वास्तव कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धा परीक्षा वास्तव भवितव्य...

अर्हम फाऊंडेशन व वास्तव कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धा परीक्षा वास्तव भवितव्य आणि दिशा या विषयावर परिसंवाद संपन्न

95

✒️पुणे(पुरोगामी न्युज नेटवर्क)

पुणे(दि.5मार्च):- -अर्हम फाऊंडेशन व वास्तव कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धा परीक्षा वास्तव भवितव्य आणि दिशा या विषयावर परीसंवादाचे आयोजन पुण्यातील पत्रकार भवन येथे करण्यात आले होते. यासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित उपस्थित होते. यावेळी अर्हम फाऊंडेशन अध्यक्ष डॉ. शैलेश पगारिया ,वास्तव कट्टाचे श्री महेश बडे , किरण निंभोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धा परीक्षेच्या सध्याच्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत यामध्ये चर्चा करण्यात आली. यावेळी एमपीएससी व यूपीएससी चे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कोरोना महामारी च्या पार्श्वभूमीमुळे फिजिकल डिस्टनसिंगचे सर्व शासकीय नियम पाळून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here