




🔸कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री चंद्रकांतजी कुमरे (शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष) हे होते
✒️कुरंडीमाल(पुरोगामी न्युज नेटवर्क)
कुरंडीमाल (दि.5 मार्च):-येथील शासकीय आश्रमशाळेत वर्ग 10 व 12 वी च्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री चंद्रकांतजी कुमरे (शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष) होते. प्रमुख अतिथी म्हणून सौ शारदाताई मडावी (सरपंच कुरंडीमाल), प्रमुख मार्गर्शक श्री. नंदकिशोरजी मसराम सर (संगीत विशारद, लेखक), तसेच टिकेशजी कूमरे (माजी सरपंच), उषाताई नैताम (पोलीस पाटील), विनायकजी मडावी (त. मू. अध्यक्ष) व मृणालिताई ढवळे यांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचे प्रासताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री. बी. एस. जाधव यांनी केले.
या श्री. नंदकिशोरजी मसराम यांनी विद्यार्थ्यांना उपयोजनात्मक शिक्षण व मूल्यशिक्षणाचे महत्त्व सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. शेंडे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री. पाटणकर सर यांनी केले. स्वागतगीत कला शिक्षक श्री. करकाडे सर व चमू यांनी सादर केले.या कार्यक्रमाला श्री. चिवंडे सर (अधीक्षक) कू. जवंजाळ मॅडम (अधिक्षिका), श्री. भाकरे सर, धात्रक मॅडम व इतर शिक्षक – शिक्षेकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थीत होते. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.




