



✒️भास्कर फरकडे(चामोर्शी,तालुका प्रतिनिधी)मो:-9404071883
चामोर्शी(दि.5मार्च):- पंचायत समिती चामोर्शी चौकशी समितीच्या अधिकाऱ्यांचा आष्टी ग्रामपंचायत मध्ये झालेल्या गाळे बांधकामाच्या भ्रष्टाचारात अधिकाऱ्यांना वाचविण्याचा केविलवाणा प्रयत्न होताना दिसत आहे.जिल्हाधिकारी गडचिरोली,व मुख्यकार्यपालन अधिकारी गडचिरोली यांच्या कडे चौकशी समितीच्या अधिकाऱ्याची तक्रार करण्याचा. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आष्टी शहर अध्यक्ष राहुल डांगे यांनी दिला इशारा
आष्टी ग्रामपंचायतचे सन २०१८ते२०२१मध्ये इंद्रावन बारसागडे ग्रामसेवक असताना यांच्या काळात मोठ्या प्रमाणात नियम धाब्यावर बसवून गाळे बांधकामांचे बांधकाम करण्यात आले व या बांधकामात भ्रष्टाचार झाल्याची तक्रार मुख्य कार्यपालन अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली यांचे कडे करण्यात आली होती त्या तक्रारी नुसार उपमुख्यकार्यकारी अधिकारी यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती चामोर्शी यांना एक समिती नेमून चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले त्या आदेशानुसार गटविकास अधिकारी यांनी एक त्रीस्तरीय चौकशी समीती नेमण्यात आली त्या समिती मध्ये एम,के,काळबांधे, विस्तार अधिकारी,एल एस कुमरे, सहायक लेखाधिकारी,एस,वि, वाघमारे, कनिष्ठ अभियंता बांधकाम,यांचा समावेश करण्यात आला परंतु या समितीने मोक्यावर न जाता केवळ उपलब्ध दस्ताएवजानुसार थातुरमातुर चौकशी करून दोषिंना अभयदान देण्याचे काम केले आहे तसेच चौकशी समितीच्या अहवालावर सहायक लेखाधिकारी पंचायत समिती चामोर्शी एल,एस कुमरे यांची स्वाक्षरी नसल्याने त्यांना सदर या चौकशी समितीच्या अहवाल मान्य नसल्याचे यावरुन दिसून येते आहे.
या चौकशी अहवालावर सहायक लेखाधिकाऱ्यांची स्वाक्षरी नसताना गटविकास अधिकारी पंचायत समिती चामोर्शी यांनी या अहवालावर स्वाक्षरी कशी काय केली आणि ही चौकशी समितीच्या अहवाल उपमुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली यांना कसा काय सादर केला.कदाचित गटविकास अधिकारी पंचायत समिती चामोर्शी यांना तर या भ्रष्टाचारावर संमती आहे का अशी शंका निर्माण होत आहे या चौकशी समितीचा अहवाल समाधानकारक नसून दिशाभूल व दोषिंना संरक्षण देणारा व भ्रष्टाचारावर पांघरूण घालणारा असल्याचे या चौकशी समिती अधिकाऱ्यांवर संसयाची सुई निर्माण होत आहे भ्रष्टाचारात लिफ्त असलेल्या लोकांना ही चौकशी समिती वाचविण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहे.अश्या समितीच्या अधिकाऱ्याची चौकशी करून कारवाई करावी हे प्रकरण गंभीर असल्याने जिल्हा परिषदेच्या वरीष्ठ पातळीवरुन सदर प्रकरणाची चौकशी केल्यास या भ्रष्टाचारात असलेले मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता नाकारता येत नाही या चौकशी समितीच्या अधिकाऱ्याची तक्रार जिल्हा अधिकारी गडचिरोली, तसेच मुख्यकार्यपालन अधिकारी गडचिरोली, यांच्या कडे करण्यात येईल असा इशारा राहुल डांगे, राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष यांनी दिला आहे


