



✒️प्रदिप रघुते(अमरावती प्रतिनिधी)मो:-9049587193
अमरावती(दि.5मार्च):-२८ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिवसाचे औचित्य साधून भौतिकशास्त्र विभाग, विनायक विज्ञान महाविद्यालय नांदगाव खंडेश्वर तर्फे राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करण्यात आला. यामध्ये महाविद्यालयातर्फे ऑनलाईन व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानमालेचा उद्घाटन सोहळा दि. २२ फेब्रुवारी २०२२ रोजी पार पडला. या व्याख्यानमालेच्या पहिल्या दिवशी प्रा. प्रेषित सिद्धभट्टी यांच्या व्याख्यानाने सुरुवात झाली. त्यानंतर दिनांक २२ फेब्रुवारी ते दिनांक २८ फेब्रुवारी २०२२ दरम्यान एकूण ५ दिवस चाललेल्या या व्याख्यानमालेत रोज एक याप्रमाणे एकूण ५ व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
सदर व्याख्यानमालेला विविध महाविद्यालयांमधून नामवंत वक्ते लाभले होते. त्यामध्ये प्रा. प्रेषित सिद्धभट्टी ,भारत महाविद्यालय बुलढाणा, डॉ. रोशनी भगत, राजर्षी शाहू सायन्स कॉलेज, चांदूर रेल्वे, डॉ. अशोक हुंबे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद, डॉ. शिल्पा विधळे,आदर्श सायन्स जे. बि. आर्ट्स, बिर्ला कॉमर्स कॉलेज, धामणगाव रेल्वे, व डॉ. किशोर राउळकर, विद्याभारती महाविद्यालय, अमरावती आदींनी या व्याख्यानमालेत मार्गदर्शन केले.
या व्याख्यानमालेचा समारोपीय सोहळा दि. २८ फेब्रुवारी रोजी पार पडला. या सोहळ्याला अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाच्या प्राचार्य, डॉ. अलका भिसे उपस्थित होत्या, प्रमुख अतिथी म्हणून डॉ. किशोर राउळकर, विद्याभारती महाविद्यालय, अमरावती, यांनी याप्रसंगी राष्ट्रीय विज्ञान दिवसानिमित्त सर सी. व्ही. रमण यांच्या जीवनावर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच त्यांच्या “अपारंपरिक ऊर्जास्रोत: सौर ऊर्जा ” या व्याख्याना मध्ये सौर ऊर्जेचे महत्व पटवून दिले.
यावेळी महाविद्यालयाच्या आय.क्यू.ए.सी समन्वयक डॉ. सुचिता खोडके, व्याख्यानमालेचे आयोजन सचिव, प्रा. डॉ. अनंत वडतकर, संयोजक प्रा. डॉ. प्रशांत खरात, सहसंयोजक प्रा. अजय अंभोरे, आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अनंत वडतकर यांनी तसेच आभारप्रदर्शन प्रा. अजय अंभोरे यांनी केले.या व्याख्यानमालेस उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून अनेक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी व्याख्यानांचा लाभ घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता व्याख्यानमालेचे आयोजन सचिव, डॉ. अनंत वडतकर, संयोजक डॉ. प्रशांत खरात, समन्वयक प्रा. अजय अंभोरे, यांनी अथक परिश्रम घेतले.


