Home महाराष्ट्र सामाजिक न्याय विभागाच्या दीड कोटी रुपयांच्या कामांना मान्यता

सामाजिक न्याय विभागाच्या दीड कोटी रुपयांच्या कामांना मान्यता

96

🔹आ सौ श्वेताताई महाले यांच्या प्रयत्नांना यश

✒️मुंबई(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

मुंबई(दि.5मार्च):- डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत चिखली विधानसभा मतदार संघातील दीड कोटी रुपयांच्या विविध कामांना मान्यता मिळविण्यात आमदार सौ श्वेताताई महाले यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत सन 2021 22 या वर्षासाठी चिखली विधानसभा मतदारसंघातील नागरी व ग्रामीण क्षेत्रातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांचा गावांचा विकास करण्यासाठी या घटकांना मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या कामांना शासनस्तरावरून दिनांक 3 मार्च 2022 रोजी मान्यता देण्यात आलेली आहे .

मध्ये उंद्री येथील सामाजिक भवन बांधकाम करणे , अमडापूर येथे सामाजिक भवन बांधकाम करणे , मंगरूळ नवघरे भवन बांधकाम करणे , पांढरदेव सामाजिक भवन बांधकाम करणे , सवणा सामाजिक भवन बांधकाम करणे , केळवद सामाजिक भवन बांधकाम करणे , करणखेड सामाजिक भवन बांधकाम करणे , सावरगाव डुकरे सामाजिक भवन बांधकाम करणे , तोरणवाडा सामाजिक भवन बांधकाम करणे , घाटनांन्द्रा सामाजिक भवन बांधकाम करणे , रायपूर सामाजिक भवन बांधकाम करणे , साखळी सामाजिक भवन बांधकाम करणे ,रायपूर मातंग समाजासाठी दहन शेड बांधकाम करणे , खैरव सभामंडप बांधकाम करणे , सावरगाव डू सभामंडप बांधकाम करणे , हातनी स्मशान भूमी सौंदर्यीकरण करणे , धोडप सभामंडप बांधकाम करणे , अमडापूर सभामंडप बांधकाम करणे , मंगरूळ नवघरे सभामंडप बांधकाम करणे , अंबाशी शहीद स्मारक बांधकाम करणे , टाकरखेड हेलगा सभामंडपास संरक्षण भिंत बांधकाम करणे , किन्होळा सभामंडपास संरक्षण भिंत बांधकाम करणे या कामांचा समावेश आहे.

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळातील हीच कामे केली होती रद्द तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या कार्यकाळात आ सौ श्वेताताई महाले यांनी हीच कामे मंजूर करून आणली होती . परंतु फडणवीस सरकार गेले आणि या सरकारने त्यांच्या कार्यकाळातील सर्व कामे रद्द केल्याने आलेला निधी सुद्धा परत घेतला होता . सामाजिक न्याय विभागाच्या कामांसोबतच आ सौ श्वेताताई महाले यांनी 2515 या योजनेतून ही जवळपास पाच कोटीची कामे फडणवीस सरकारच्या काळात आणली होती . त्या कामांचा निधी सुद्धा या सरकारने परत घेतला . दोन्ही सामाजिक न्याय विभाग आणि 2515 दोन्ही निधी परत मिळविण्यासाठी आ सौ श्वेताताई महाले यांनी पत्र व्यवहार आणि संसदीय आयुधे वापरुन पाठपुरावा केला होता . 2515 मधील मंजूर परंतु रद्द झालेली कामे आ सौ श्वेताताई महाले यांनी त्यांच्या आमदार निधीतून पूर्ण केली . तसेच आता सामाजिक न्याय विभागाच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतून तीच कामांना मान्यता मिळाल्याने बऱ्याच दिवसापासून रखडलेली कामे पूर्णत्वास जाणार आहे.
या कामांना मान्यता मिळाल्यामुळे आ सौ श्वेताताई महाले पाटील यांनी विरोधी पक्षनेते ना देवेंद्र फडणवीस , ना प्रवीण दरेकर , पालकमंत्री ना.डॉक्टर राजेंद्र शिंगणे,साहेब ,सामाजिक न्याय मंत्री ना धनंजय मुंढे साहेब यांचे आभार व्यक्त केले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here