Home महाराष्ट्र ट्रॅक्टरची मोटार सायकलला धडक

ट्रॅक्टरची मोटार सायकलला धडक

70

🔺एकाचा जागीच मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी

🔺सोंदरी – सुरबोडी रस्त्यावरील घटना

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रह्मपुरी(दि.5 मार्च): -काही खासगी कामानिमित्त सोंदरी वरून वडसा कडे दुचाकीने जात असतांना सुरबोडी वरून विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रॅक्टरने दुचाकीला धडक दिल्याने एका युवकाचा जागीच मृत्यू तर दुसरा व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे जखमीला ब्रह्मपुरी येथील एका खाजगी दवाखान्यात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे सदर घटना दिनांक 3 मार्च 2022 रोजी सायंकाळी 7 वाजताच्या दरम्यान घडली असून शिवा योगेश देसाई वय(18) रा. देसाईगंज (वडसा) असे मृतक युवकाचे नाव आहे तर गंभीर जखमी असलेल्या व्यक्तीचे नाव महेश दयाराम आंबोने असे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार सध्या शेतातील रब्बी माल मळणीचा हंगाम परिसरात सुरू आहे पिंपळगाव येथील ट्रॅक्टर व मळणी यंत्र घेऊन ट्रॅक्टर चालक राजू श्रीराम धांडे वय(31) हा चिखलगांव येथील काही शेतकऱ्यांच्या शेतातील रब्बी मालाची मळणी करून पिंपळगाव येथील स्वगावी ट्रॅक्टरने सोंदरी सुरबोडी रस्त्याने येत होता तर दरम्यान विरुद्ध दिशेने सोंदरी वरून वडसा देसाईगंज कडे येथील महेश दयाराम आंबोने वय 28 वर्षे व शिवा योगेश देसाई वय 18 वर्ष देसाईगंज हे दोघे वडसाकडे जात असतांना सुरबोडी-सोंदरी मार्गावर मोटार सायकलची व टँक्टरची जबर धडक झाली त्यात शिवा योगेश देसाई वय 18 वर्ष जागीच ठार झाला तर दुसरा महेश दयाराम आंबोने वय 28 वर्षे पाय तुटल्याने गंभीर जखमी असुन डॉ दोनाडकर हाँस्पीटल मध्ये उपचार सुरु आहे ट्रॅक्टर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून घटनेचा तपास ब्रह्मपुरी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रोशन यादव यांचे मार्गदर्शनाखाली बीट अमलदार अरुन पिसे करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here