




✒️गडचिरोली प्रतिनिधी(चक्रधर मेश्राम)
गडचिरोली(दि.4मार्च):-शेतजमीनीचे फेरफार करण्याकरिता १२ हजार रूपयांची लाच स्विकारल्या प्रकरणी सा.जा.क्र. १९, येवली येथील तलाठी महेश भिमराव गेडाम (४०) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.
प्राप्त माहितीनुसार, तक्रारदार यांच्या सुनेच्या नावे खरेदी केलेल्या शेत जमीनीचे फेरफार करण्याच्या कामाकरीता तलाठी महेश भिमराव गेडाम यांनी १० हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली. तक्रारदार यांना लाच रक्कम देण्याची कोणतीही इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गडचिरोली येथे तक्रार नोंदविली. तक्रारिच्या आधारे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गडचिरोली येथील अधिकाऱ्यांनी शहानिशा करून सापळा करावाईचे आयोजन केले.
आज ३ मार्च रोजी तलाठी महेश गेडाम यांनी १२ हजार रुपयांची पंचासमक्ष मागणी करून १२ हजार रूपये स्विकारून चारचाकी वाहनाने पळून जात असतांना गडचिरोली ते चंद्रपूर रोडवरील कनेरी नाक्याजवळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पाठलाग करून रंगेहाथक पकडले. यावरून आरोपी तलाठी महेश गेडाम यांच्याविरूध्द गडचिरोली पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधिक्षक सुरेंद्र गरड, सफौ प्रमोद ढोर, पोहवा नथ्थु धोटे, नापोशि किशोर जौंजाळकर, श्रीनिवास संगोजीख् राजु पदमगिरवार, स्विप्निल बांबोळे, पोशि किशोर ठाकुर, संदिप घोरमोडे, संदिप उडाण, मपोशि विद्या म्हशाखेत्री, जोत्सना वसाके व चापोहवा तुळशिराम नवघरे यांनी केली.




