



✒️कंधार,विषेश प्रतिनिधी(हानमंत चंदनकर)मो:-8767514650
कंधार(दि.4मार्च):-परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी हे दि २५ रोज शुक्रवार सायंकाळी ५ वाजता उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय कंधार येथे आले. तसेच वार्षिक तपासणीनिमित्त कंधार उपविभागीय कार्यालयात वृक्षारोपण करण्यात आले.विशेष पोलीस उपमहानिरीक्षक तांबोळी यांनी कार्यालय परिसराची पाहणी केली. यावेळी पोलीस अधिक्षक प्रमोद कुमार शेवाळे, अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, उपपोलीस अधीक्षक (गृह) अश्विनी जगताप यांची उपस्थिती होती. पोलीस महानिरीक्षक तांबोळी यांनी कंधार उपविभागातील कंधार, लोहा, माळाकोळी, उस्मान नगर
पोलीस ठाण्याची तसेच प्रलंबित हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. गुन्हे दप्तर तपासणी करून कंधार उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय परिसराची पाहणी करून परिसरातील वृक्षसंवर्धनाबाबत सुचना केली. कार्यालया समोरील मोकळ्या जागेत सायं ६ वाजताच्या सुमारास नारळाचे झाडाचे रोपण केले. आणि पोलीस अधीक्षक प्रमोद कुमार शेवाळे यांनी वृक्षारोपण करताना सर्वांनी एक रोप दत्तक उपस्थिती घेऊन त्यांचे संवर्धन करावे असे आवाहन केले त्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, उपपोलीस अधीक्षक (गृह) अश्विनी जगताप, उपविभागीय पोलिस अधिकारी मारोती थोरात कंधार पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक आर. एस. पडवळ यांच्या परिश्रम घेतले
पोलीस निरीक्षक संतोष तांबे, माळाकोळी पोलीस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक एम. ए डोके, उस्मान नगर पोलीस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक डि.ए देवकत्ते यांच्यासह कंधार उपविभागातील सर्व सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांची होती. यावेळी वृक्षारोपणासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी मारोती थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक एम. ए डोके, रमेश गीते, रवींद्र कचरे, ब्रह्मानंद लामतुरे, शेख साजिद, शेख मगदूम, गुरु कारामुग, मुळे, ड्रायव्हर वाघमारे, राठोड यांनी परिश्रम घेतले.





