Home महाराष्ट्र रिध्दपुर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या विटंबणेची सविस्तर चौकशी करुन दोषींवर कार्यवाही...

रिध्दपुर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या विटंबणेची सविस्तर चौकशी करुन दोषींवर कार्यवाही करा !

90

🔹आमदार देवेंद्र भुयार यांनी केली गृहमंत्री दिलीप वळसे पटलांकडे मागणी !

✒️मोर्शी(पुरोगामी न्युज नेटवर्क)

मोर्शी(दि.4मार्च):- तालुक्यातील रिध्दपुर येथील तिवसा रोड चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास तोंडावर अज्ञात व्यक्तीने दिनांक ०३.०३.२०२२ चे रात्री शेण व माती लावुन पुतळ्याची विटंबणा केली आहे. ही बाब अत्यंत घृणास्पद आहे. त्यामुळे रिघ्दपुर गावात अत्यंत तणाव पुर्ण वातावरण निर्माण झाले आहे. तसेच सदर घटनेमुळे रिध्दपुर गावात व अमरावती जिल्ह्यात दंगे होण्याची शक्यता नाकारत येत नाही. सदर उद्भवणा-या परिस्थितीमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवु शकतो. व समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे. करीता सदर झालेल्या घटनेची सविस्तर चौकशी करण्याचे संबधितांना आदेश देवुन सविस्तर चौकशी करुन दोषींवर कार्यवाही करण्याचे आदेश देण्याची मागणी आमदार देवेंद्र भुयार यांनी गृह मंत्री दिलीप वळसे पाटील यांना भेटून केली आहे.

यावेळी गृह मंत्री दिलीप वळसे पाटील यांना निवेदन देतांना आमदार देवेंद्र भुयार, राज्यमंत्री श्री संजयजी बनसोडे यांच्यासह आदी मंडळी उपस्थित होती. यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी जिल्हा पोलिस अधिक्षक यांच्याशी याबाबत संवाद साधून तातडीने कारवाई करण्यास सूचना दिल्या आहेत.जिल्ह्यातील व मोर्शी तालुक्यातील समस्त जनतेला तथा आंबेडकरी चळवळीतील संघटनांनी या घटनेचा शांततेत निषेध करावा जेणेकरून सामाजिक सलोखा बिघडणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन आमदार देवेंद्र भुयार यांनी केले.

श्री क्षेत्र रीद्धपूर येथे काही समाज कंटकांनी महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची अवमानना केल्याची घटना निंदनिय आणि वेदनादायी आहे. या घटनेचा मी जाहीर निषेध करतो —- आमदार देवेंद्र भुयार

Previous articleजय भिम मित्र मंडळाच्या वतीने नायगांवात शिवानंद पांचाळ यांचा सत्कार
Next articleकंधार ठाण्याचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षकांनी केली तपासणी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here