Home क्राईम खबर  भामट्यांनी शिक्षकाला आमिष दाखवून 29 लाख रूपयांचा घातला गंडा

भामट्यांनी शिक्षकाला आमिष दाखवून 29 लाख रूपयांचा घातला गंडा

81

✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114

बीड(दि.4मार्च):-‘कौन बनेगा करोडपती’ अर्थात केबीसी हा संबंध देशभरात गाजलेला टिव्ही शो. मात्र याच शोच्या नावाचा गैरवापर करत सायबर भामटे नेहमी सावज’ शोधत असतात. असाच एक ऑनलाईन फ्रॉडचा प्रकार बीडमध्ये समोर आला आहे.केबीसी’ नावाच्या व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपमध्ये समाविष्ट करुन शहरातील एका शिक्षकाला सायबर भामट्यांनी केबीसी लॉटरी व कारचे आमिष दाखवून तब्बल 29 लाख 23 हजार रुपयांना गंडा घातला.कार अन् लॉटरीच्या मोहात अडकलेल्या शिक्षकाला हे भामटे 30 वेळेस कॉल करुन विविध प्रक्रिया शुल्क, टॅक्स, जीएसटी, सेवाशुल्क, वाहतूक खर्च आदीच्या नावाखाली पैसे भरावे लागतील असे सांगून वेगवेगळे बँक खाते नंबर देवून लुटत राहिले.

अखेर आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्यानंतर या सार्‍या ऑनलाईन फ्रॉडचा भांडाफोड झाला.शिक्षकाच्या फिर्यादीवरुन 2 मार्च रोजी रात्री शहर पोलीस ठाण्यात दोन आरोपीविरुध्द गुन्हा नोंद झाला आहे. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात फसवणूक व माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये मनीष कुमार, आकाश वर्मा यांच्यावर गुन्हा नोंद झाला.तपास पो.नि.रवी सानप करत आहेत. अमिषाला भुलून नागरिकांनी अशा अनोळखी व्यक्तींशी व्यवहार करुनस्वत:ची आर्थिक फसवणूक करुन घेऊ नये असे आवाहन बीड शहर ठाणे निरीक्षक रवी सानप यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here