Home महाराष्ट्र निर्जळी धर्माबादकरांसाठी भाजपचे उपोषण की निवडणुकीचा स्टंट?

निर्जळी धर्माबादकरांसाठी भाजपचे उपोषण की निवडणुकीचा स्टंट?

82

✒️धर्माबाद प्रतिनिधी(हानमंत चंदनकर)

धर्माबाद(दि.4मार्च):-नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नीलम कांबळे यांनी मनमानी करत शहरातील ९५ ठिकाणचा सार्वजनिक पाणीपुरवठा खंडित केला असून या निर्णयामुळे सामान्य लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.असा आरोप करत ही सेवा पूर्ववत सुरु करावी या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष रविंद्र पोतगंटीवार यांनी बुधवार ( ता.२) पासून अमरण उपोषण सुरु केले आहे.या शिवाय शंकरगंज,दुर्गानगर भागातील पिण्याच्या पाण्याचे पाईपलाईन सुरु करणे,कंत्राटी सफाई कामगारांचे वेतन अदा करणे,पंतप्रधान आवास योजनेतील शेवटचा हप्ता जमा करणे या प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर प्रस्तुत प्रतिनिधीने नगर परिषदेतून माहिती घेतली असता एका कर्मचाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की,नांदेडचे जिल्हाधिकारी विपीन इटणकर यांच्या आदेशानव्ये ”आझादी का अमृत महोत्सव” या उपक्रमांतर्गत धर्मबाद नगर परिषदेने मालमत्ता कर व नळपट्टीच्या शंभर टक्के वसुलीचे उदिष्टे ठेवले होते.या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणचे कनेक्शन कट केले होते.

परंतू ज्या ठिकाणी अत्यावश्याक आहे अशा भागातील इंदिरा नगर (ससाने,रेड्डी,जे.के.जोंधळे, गोणारकर यांच्या घराजवळील) मौलाली नगर (मूकबधिर शाळेजवळील,बाबुभाईच्या घराजवळील,मुस्लिम स्मशान भूमी,)सूत गिरणी,एच पी गॅस गोदाम पोचम्मा मंदिर आणि सत्तार नगर या ठिकाणचे कनेक्शन बंदच केले नव्हते.तसेच रत्नाळी येथील तीन ठिकाणचे हर्ष नगर,सरस्वती नगर,साठे नगर,शंकर गंज मधील एक – एक आणि फुले नगर मधील चार तर बाळापूर मधील तीन सार्वजनिक इंधन विहिरीचे कनेक्शन बंद करून पुन्ह चालू करण्यात आले आहेत.

गावठाण प्रमाणपत्रासाठी भूमिअभिलेख कार्यालयाशी पत्र व्यवहार करण्यात आला असून हद्द निश्चित करण्यासाठी कारवाई करण्याची विनंती करण्यात आली आहे.यासाठी लागणारी १ लाख २० हजार रुपये फी नगर परिषदने भरली आहे.अशी माहिती प्राप्त झाली आहे. भारतीय जनता पक्षाने हा विषय लावून धरला असला तरी या १६३ फायली नेमक्या आहेत तरी कोणाच्या? या विषयी उलट – सुलट चर्चा लोकांमध्ये सुरु आहे.धर्माबाद नगर परिषदेच्या निवडणुका जवळ आल्या असल्यामुळे हे उपोषण निवडणुका पूर्वीचे स्टंट तर नाही ना अशी ही शंका व्यक्त केली जात आहे.

यावेळी उपोषणस्थळी बाजार समितीचे माजी सभापती गणेशराव पाटील करखेलीकर,माजी उपनगराध्यक्ष मौगला गौड, संजय पाटील शेळगावकर,पिराजी पाटील चव्हाण,भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष सनित शक्करवार,भाजपा अनुसूचित जमातीचे शहर अध्यक्ष बालाजी बकवाड,शहर अध्यक्ष रामेश्वर गंदलवार, सतिष मोटकूल, सज्जन गड्डोड, नानकसिंग डिल्लो, अंजू बोल्लमवार, साईनाथ शिरपुरे,विनोद बोईनवाड,गिरधर बुंदले,अमित मुंदडा, श्रीनिवास अंदेलवार,चक्रेश पाटील बन्नाळीकर, अनिल माकणे,अनिल बेंडके,प्रविण बेल्लूरकर, तुकाराम महागवळी,भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष विनोद पाटील जोगदंड,मारोती जाधव, चैतन्य घाटे, विजयकुमार अटकाळे,बाबू पाटील नरवाडे, भाजपाचे माजी नगरसेवक संजय पवार यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपास्थित होते.

चौकट

विशेष म्हणजे भाजपचे आमदार राजेश पवार समर्थक या उपोषणाकडे पाठ फिरवलेले दिसून आले .त्यामुळे भाजपामधील गटबाजी पुन्हा एकदा समोर आली आहे.या गटबाजीचा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये नक्की फटका बसेल असे राजकीय विश्लेषकांच म्हणणे आहे…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here