Home अमरावती नांदगाव खंडेश्वर येथे महाशिवरात्रीनिमित्त महाप्रसादाचे आयोजन

नांदगाव खंडेश्वर येथे महाशिवरात्रीनिमित्त महाप्रसादाचे आयोजन

92

✒️प्रदिप रघुते(अमरावती प्रतिनिधी)मो:-9049587193

अमरावती(दि.4मार्च):-नांदगाव खंडेश्वर येथे महाशिवरात्री निमित्त दिनांक 02 मार्च 2022 रोजी आठवडी बाजार नांदगाव खंडेश्वर येथे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले गेल्या दोन वर्षापासून कोरोना प्रसारामुळे नांदगाव खंडेश्वर येथील खंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीचा कार्यक्रम अतिशय साध्या पद्धतीने करण्यात आला. या वर्षीसुद्धा सरकारी नियमाप्रमाणे नेमून दिलेल्या नियमानुसार खंडेश्वर संस्थांकडून महाशिवरात्री महोत्सव अतिशय साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला.

परंतु जनतेच्या मागणीनुसार अनेक कार्यकर्त्यांच्या उत्साहामुळे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. सदर महाप्रसादाच्या कार्यक्रमामध्ये कोरोनाच्या नियमाचे पालन काटेकोरपणे करण्यात आले. या महाप्रसाद करिता गावातील समस्त गावकरी मंडळी यांनी तन-मन-धनाने सहकार्य केले. तसेच शहरातील अनेक युवकांनी एकत्र येऊन नियोजनपूर्वक हा महाशिवरात्री निमित्त महाप्रसाद कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here