Home महाराष्ट्र मा.भगतसिंह कोशारी तुमची जीभ आवरा, नाही तर जनता तुमचे धोतर फेडेल ?...

मा.भगतसिंह कोशारी तुमची जीभ आवरा, नाही तर जनता तुमचे धोतर फेडेल ? – मा.दादासाहेब शेळके (राष्ट्रीय अध्यक्ष भीम टायगर सेना)

118

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

यवतमाळ(दि.3मार्च):-दि.27 फेब्रुवारी 2022 रोजी राज्याचे राज्यपाल मा. भगतसिंग कोशारी हे औरंगाबाद येथील तापडिया नाट्य सभागृहात भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त एक दिवशीय श्री समर्थ साहित्य संमेलनात त्यांनी एक वादग्रस्त विधान करुन ते “साठी बुद्धी नाठी”असल्याचे सिद्ध झालेले आहे.ते गुरुच्या बाबतीत बोलताना म्हणाले “चाणक्य के बिना चंद्रगुप्त को कोण पहचानेगा और समर्थ के बिना शिवाजी को कोण पहचानेगा असे म्हणून द्रोह केला आहे.या त्यांच्या भाषणात छ. शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला 2 ) समर्थ रामदास यांचा छ. शिवाजी महाराजांचा गुरु असा उल्लेख केला त्याबद्दल मी भिम टायगर सेनेच्या वतीने त्यांचा “जाहीर निषेध” करतो.

मुळातच राज्यपाल हे पद संविधानिक असून मा.भगतसिंग कोशारी यांची भारतीय संविधान हा भाग-6 राज्य आर्टिकल 155 नुसार राज्यपाल पदी निवड झालेली असुन आर्टिकल 159 नुसार राज्यपाल पदाची शपथ घेताना त्यांनी सविधान कायदा व सुव्यवस्था यांची जबाबदारी घेतलेली असताना सुद्धा त्यांनी वरील वादग्रस्त विधान करून स्वतः कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचे काम केलेले आहे.इतिहासाची पाने चाळत असताना मनुवाद्यांनी अनेकदा स्वतःचे व ब्राह्मणाचे महत्त्व वाढवण्यासाठी ब्राह्मणाला गुरु बनवून बहुजन महापुरुषांचे महत्व कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे.

राज्यपाल कोषारी यांनी छ. शिवाजी महाराजांचे बद्दल काढलेले अनुद्गार हे मनुवादी संघीय मानसिकतेतून आलेले असुन इतिहासाला छेद देणारे आहे.व ते छ.शिवाजी महाराजांची बदनामी करणारे आहे.मुळात छ.शिवाजी महाराजांचे गुरु मां जिजाऊ अस ताना जाणून-बुजून जातीवादी मनुस्मृती समर्थक व दलितां बद्दल अत्यंत खालच्या स्तरावर बदनामी करणार्या समर्थ रामदास यांना छ.शिवाजी महाराजांचा गुरु म्हणणे म्हणजे आजही जेम्स लेन व पुरंदरेची औलाद जिवंत असल्याचा पुरावा आहे.महाराजाची बदनामी पहिल्यांदाच घडली नाही तर त्यांनी गोबेल्स नितिचा वापर करून अनेकदा हे घडविले आहे उदा. ब.मो.पुरंदरे हे छ.शिवाजी महाराजांना बहुजन प्रतिपालक म्हणण्या ऐवजी गो ब्राह्मण प्रतिपालक म्हणायचे, दादोजी कोंडदेव यांना छ. शिवाजी महाराज यांचे गुरु म्हणणे,
जेम्स लेन लिखित “हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया” या पुस्तकात छ. शिवाजी महाराजांची बदनामी करणे,
छ. शिवाजी महाराजांना भवानी मातेने तलवार दिली म्हणून महाराजांचे कर्तुत्व नष्ट करणे ( मां जिजाऊ ने बहुजनांचा राज्य प्रस्थापित करण्यासाठी पोर्तुगीज राष्ट्रातून अष्टधातु पासून बनविलेली तलवार छ. शिवाजी महाराजांना दिली हा इतीहास ), छ.शिवाजी महाराजांना हिंदू राजा म्हणून इतर धर्मियांच्या मनात द्वेष पसरवणे. (उलट हिंदू धर्मा बरोबर सर्व धर्मांचा राजा छ.शिवाजी महाराज होते., छत्रपती शिवाजी महाराजांना मुस्लीम विरोधक सांगणे. (छ.शिवाजी महाराजांच्या राज्यात अनेक मावळे मुस्लिम होते. उदा. दौलतखान, मदारी मेहतर, इब्राहिम खान इ.) , छ.शिवाजी महाराजांच्या जन्म तारखे बद्दल घोळ घालणे., ब्राह्मण ब. मो. पुरंदरे यांनी “राजा शिव छत्रपती” या पुस्तकात छ. शिवाजी महाराज यांची बदनामी करणे.आणी आता समर्थ रामदासांना छ.शिवाजी महाराजांचा गुरु म्हणून महाराजांची बदनामी करून ब्राह्मणांचे वर्चस्व वाढविण्याचाच प्रकार आहे.

समर्थ रामदास हे छ.शिवाजी महाराजांचे गुरु आहेत असा उल्लेख ज्या चाफळच्या सनदे मध्ये सांगितलेला आहे त्यात छ.शिवाजी महाराज समर्थ रामदास बद्दल म्हणतात की तुमच्या मार्गदर्शनाची मला गरज आहे. त्या चाफळच्या सनद बाबतीत 1) इतिहासकार महादेव पगडी म्हणतात चाफळची सनद हि खोटी,नकली,आणी बनावट आहे.2) इतिहासकार इंद्रजीत सावंत, पांडुरंग बलकवडे, केळूसकर गुरुजी यांनी त्यांच्या पुस्तकात समर्थ रामदास व छ. शिवाजी महाराज यांची भेट झाली नसल्यामुळे गुरु होण्याचा संबंध येत नाही असे म्हटले.3) 16 जुलै 2018 ला औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने पराव्याच्या आधारे निर्णय दिला आहे छ.शिवाजी महाराज यांचा आणि समर्थ रामदास यांची भेटच झाली नाही त्यामुळे समर्थ रामदास हे छ.शिवाजी महाराजांचे गुरु असण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही.
4) छ. शिवाजी महाराज विद्यापीठाचे कुलगुरू आप्पासाहेब पवार हे “इंडियन हिस्टरी” या पुस्तकात तर इतिहासकार न.रा.फाटक हे दोघेही आपल्या पुस्तकात लिहितात रामदास हे छ.शिवाजी महाराजांचे गुरू असल्याचा तिळमात्र संबंधच नाही तसा इतिहासात कोणताही पुरावा सापडत नाही.कारण उभ्या आयुष्यात त्यांची भेट झाली नाही. 5) मा. म. देशमुख इतिहासकार हे “रामदास आणि पेशवाई” या पुस्तकात लिहितात रामदास गोसावी हा आदिलशहाचा हेर होता असे शेकडो उदाहरणे आहेत की समर्थ रामदास आणि छ. शिवाजी महाराज यांची उभ्या आयुष्यात भेट झाली नाही.

त्यामुळे महाराजांचे रामदास हे गुरु असण्याचा प्रश्न निर्माण होत नाही. त्यामुळे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना इशारा देतो की हा महाराष्ट्र छ शिवाजी महाराज, म.ज्योतीबा, फुले, राजर्षी शाहू महाराज- डॉ.बाबासाहेब आंबेडकर इत्यादी महापुरुषांच्या विचारांचा असून आपण वेळीच आपल्या जिभेला आवर घाला.अन्यथा महापुरुषांच्या विचाराचे वारसदार तुमचं धोतर फेडल्याशिवाय राहणार नाहीत तेव्हा तुम्हाला पळता भुई थोडी होईल एवढे मात्र नक्की अशी महत्वाची माहिती पुरोगामी न्युज नेटवर्क सोबत बोलतांना व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here