Home महाराष्ट्र सनगर समाजाच्यावतीने अनिल देसाई व डॉ.शिवाजी ढोबळे यांचा म्हसवड येथे सत्कार

सनगर समाजाच्यावतीने अनिल देसाई व डॉ.शिवाजी ढोबळे यांचा म्हसवड येथे सत्कार

116

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.4मार्च):- ता. माण येथील सणगर सेवा समाज मंडळ यांच्या वतीने श्री.गणेश मंदिरामध्ये नुकताच अनिल भाऊ देसाई व डॉ.शिवाजी ढोबळे यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला.
यावेळेला अध्यक्ष बाळासाहेब पानसांडे , उपाध्यक्ष शिवशंकर डमकले , नगरसेवक विकास गोंजारी , धनंजय पानसांडे, दत्तात्रय गोंजारी , चेतन ढवण , दिनेश डमकले हेमंत ढवण , माजी अध्यक्ष दत्तात्रय त्रिगुणे , माजी सचिव सुशिल त्रिगुणे आदी मान्यवर उपस्थित होते.

मा.श्री.अनिलभाऊ देसाई यांची सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल व बलवडी ता. सांगोला येथील सणगर समाजाचे सुप्रसिद्ध डाक्टर श्री.शिवाजी ढोबळे यांनी कोरोना काळात उत्कृष्ट वैद्यकीय सेवा दिल्याबद्दल समाज भुषण पुरस्कार मिळाल्याबद्दल आहे म्हसवड येथील सणगर समाज बांधवांनी फेटा , शाल , पुष्पहार , गणेश प्रतिमा व श्रीफळ देऊन भव्य नागरी सत्कार करण्यात आला आहे.यावेळी सातारा जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई म्हणाले सणगर समाजाच्या प्रत्येक कार्यामध्ये जिल्हा बँकेच्या माध्यमातून आम्ही मदत करण्यासाठी सक्रिय आहोत . भविष्यात सणगर समाजाच्या मंदिरासाठी आम्ही सर्वतोपरी मदत करणार आहे. याच प्रमाणे सणगर समाजातील तरुणांना उद्योग व्यवसाय करण्यासाठी आम्ही बँकेच्या माध्यमातून आवश्यक असणारे कर्ज उपलब्ध करून देऊ असे आश्वासन या वेळेला देसाई यांनी दिले.

यावेळी डॉक्टर शिवाजी ढोबळे म्हणाले समाजातील युवकांनी नोकरीच्या पाठीमागे न लागता स्वतःचा व्यवसाय करून आपली प्रगती साधावी पारंपारिक व्यवसाय बंद पडले असल्यामुळे नवीन व्यवसाय शोधणे हे तरुणांसाठी आव्हान बनलेले आहे तरुणांनी नवीन अहवाल स्वीकारून व्यवसाय उद्योग करावे शिक्षण क्षेत्रामध्ये तरुणांनी लक्ष घालून शैक्षणिक प्रगती करावी असे विचार या वेळेला ढोबळे आणि व्यक्त केले आहे.यावेळी माजी अध्यक्ष दत्तात्रय त्रिगुणे , माजी सचिव सुशिल त्रिगुणे , सुभाष गोंजारी , सचिव विकास गोंजारी , संदीप गोंजारी , दिनेश डमकले आदींनी मनोगत व्यक्त केले.
अध्यक्ष बाळासाहेब पानसांडे यांनी प्रास्ताविक केले , राजाराम तोरणे यांनी सुत्रसंचलन केले तर चेतन ढवण यांनी आभार मानले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here