



✒️मलकापूर(पुरोगामी न्युज नेटवर्क)
मलकापूर(दि.3मार्च):-वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बहुजन नायक ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर खामगाव येथे सभेप्रसंगी बेलगाम व बेताल वक्तव्य करणारे ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांच्या विरुद्ध २ मार्च रोजी मलकापूर येथे जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले.वंचित बहुजन आघाडी मलकापूर तालुक्याचे वतीने स्थानिक उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी करीत तीव्र निषेध आंदोलन करीत उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले तथा नितीन राऊत यांनी बाळासाहेब आंबेडकर यांची जाहीर माफी मागावी अशी मागणी करण्यात आली.
या आंदोलनप्रसंगी जिल्हा महासचिव अतिशभाई खराटे यांनी बोलताना डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे वैचारिक वारसदार ऍड. बाळासाहेब आंबेडकर या देशातील राष्ट्रीय नेतृत्व असून ते वंचित घटकातील जनतेच्या न्याय हक्कासाठी तथा त्यांना स्वाभिमानी सत्तेत बसविण्यासाठी कार्य करीत आहे आहेत,त्यामुळे नितीन राऊत यांनी आम्हीच खरे वारसदार आहोत हे समाजाला कितीही हात कापून रक्त दाखवन्याचा प्रयत्न केला तरी तो यशस्वी होणार नाही आणि प्रस्थापित घराणेशाही जपणाऱ्या काँग्रेसची हुजरेगिरी करणाऱ्या लोकांनि आंबेडकरी जनतेला स्वाभिमान शिकवू नये तथा आंबेडकर परिवारावर टीका करू नये अन्यथा तुमची जागा तुम्हाला दाखविल्याशिवाय आंबेडकरी जनता राहणार नाही असे मत व्यक्त केले.
या निषेध आंदोलनात जिल्हा महासचिव अतिशभाई खराटे,जिल्हा संघटक भाऊराव उमाळे, जील्हा उपाध्यक्षा रेखाताई नीतोने, तालुकाध्यक्ष सुशील मोरे,महीला तालुकाध्यक्ष दक्षशिला झनके,महासचिव नरसिंग चव्हाण,शहर अध्यक्ष विलास गुरव,भा.बौ. महासभा तालुकाध्यक्ष राजू शेगोकार,दादाराव राणे, वंचितचे नारायण जाधव,शेख यासीन कुरेशी,अनिल पाचपोळ, गणेश सावळे,दिलीप वाघ,विनोद निकम,सुनील चव्हाण,गजानन झनके,भीमराज मोरे,डिगांबर मोरे,जनार्दन इंगळे,अजय निकम,सागर निकम,राजेंद्र वानखेडे,किशोर मोरे,सुनील वानखेडे,अजय इंगळे, हरीचांद्र गुरचळ,अशोक तायडे,सुरेश गायकवाड,बाळू बावस्कर,विश्वास राणे,आत्माराम मोरे,वसुदेव गंगतीरे,यांचेसह पदाधिकारी शेकडो महीला,पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते


