Home बीड निष्ठावंत कार्यकर्त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेत सत्तेचे हक्कदार व्हावे. प्रा.किसन चव्हाण

निष्ठावंत कार्यकर्त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेत सत्तेचे हक्कदार व्हावे. प्रा.किसन चव्हाण

218

🔸वंचित बहुजन आघाडी कार्यकर्ता आढावा बैठक संपन्न

✒️विशेष प्रतिनिधी(समाधान गायकवाड)

बीड(दि.३मार्च):-वंचित बहुजन आघाडी चे संस्थापक अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशान्वये व वंचित बहुजन आघाडी प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर यांच्या सूचने नुसार आगामी काळात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगर पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये पक्ष सर्व ताकदीनिशी निवडणूक लढणार असल्याचे बीड जिल्हा प्रभारी तथा प्रदेश उपाध्यक्ष.प्रा चव्हाण यांनी (दि ०१ रोजी) स्पष्ट केले.येथील हॉटेल गोल्डन चॉईस सभागृहात वंचित बहुजन आघाडी कार्यकर्ता आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा किसन चव्हाण व कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोक हिंगे (पाटील) उपस्थित होते. तर विचार मंचावर बीड जिल्हाध्यक्ष शैलेश कांबळे (पूर्व) उद्धव खाडे (पश्चिम) महासचिव मिलिंद घाडगे,ज्ञानेश्वर कवठेकर ,धम्मानंद साळवे, डॉ.नितीन सोनवणे, बळीराम सोनवणे, पुष्पाताई तुरुकमारे उपस्थित होते.

पुढे बोलताना प्रा.चव्हाण म्हणाले की,वंचित बहुजन आघाडी ही प्रमाणिक त्यागी व समर्पक वृत्तीच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या बळावरच विस्तारतेय आणि हेच निष्ठावंत कार्यकर्ते आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सत्तेचे हक्कदार म्हणून अग्रस्थानी असणार आहेत. तेव्हा वंचित बहुजन आघाडी च्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद गट प्रमुख, पंचायत समिती गण प्रमुखांच्या, गाव प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर करून सर्कल मेळाव्यांचे आयोजन करावे असे आवाहन केले.वंचित बहुजन आघाडीचे विभागीय अध्यक्ष अशोक हिंगे पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हटले की प्रस्थापित राजकीय घराणेशाही मोडीत काढून वंचित कडून आलुतेदार बलुतेदार,छोटा ओबीसी व सर्वात मोठा वर्ग असलेला गरीब मराठा समाजातील तरुणांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडणूक लढवुन सत्ता परिवर्तनाच्या या लढाईत सक्रिय सहभाग नोंदवा असे मत व्यक्त केले.

वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष उद्धवजी खाडे यांनी कार्यकर्ता आढावा बैठकीत मार्गदर्शन करतांना सांगितले की ,वंचित बहुजन आघाडी या पक्षाच्या तिकीटा वरती होऊ घातलेल्या बीड नगरपरिषद निवडणुकीत जवळपास वीस प्रभागांमध्ये निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संमती दर्शवुन नोंदणीही केली आहे.
शेवटी कार्यक्रमाचे आभार वंचित बहुजन आघाडीचे बीड तालुकाध्यक्ष किरण वाघमारे यांनी मानले.या कार्यक्रमास वंचित बहुजन आघाडी संपूर्ण जिल्हा कोर कमिटी, तालुका कमिटी व पक्षाचे आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चौकट
हृदय सत्कार:

वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा प्रभारी तथा राज्य उपाध्यक्ष प्रा.किसनराव चव्हाण यांना संगमनेर येथील नामवंत कवी दिनकर साळवे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ सुजात फाउंडेशन यांच्या वतीने दिला जाणारा पुरस्कार जाहीर.संतशिरोमनी गुरू रोहिदास महाराज व संत कंकैय्या महाराज यांच्या जयंती दिनी राष्ट्रीय चर्मकर महासंघ माजलगाव च्या वतीने समाज भूषण पुरस्काराने सन्मानणीत धम्मानंद साळवे यांचा हृदय सत्कार वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख डॉ.गणेश खेमाडे, जिल्हा सहसचिव मेजर अनुरथ वीर, तालुकाध्यक्ष किरण वाघमारे, श्रीकांत वाघमारे ऋषिकेश वाघमारे.

Previous articleलोकांना चांगल्या आरोग्य सुविधा देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करा – आ.डॉ.रत्नाकर गुट्टे
Next articleशिवरायांशिवाय रामदासांना कोण विचारतो?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here