Home महाराष्ट्र ग्राम रोजगार सेवक संघटनेची बैठक संपन्न

ग्राम रोजगार सेवक संघटनेची बैठक संपन्न

90

✒️नायगाव प्रतिनिधी(हानमंत चंदनकर)

नायगाव(दि.2मार्च):-महाराष्ट्र ग्राम रोजगार सेवक संघटनेची बैठक नायगाव शहरातील पाटबंधारे विश्रामगृह येथे मराठी पत्रकार संघटनेचे जिल्हाप्रमुख कॉम्रेड प्रदीप नागापूरकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच संपन्न झाली असून यामध्ये नायगाव तालुक्यातील सदर संघटनेच्या तालुका कार्यकारिणीची फेरनिवड करण्यात आली.मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप नागापूरकर यांना राज्यपालांनी सन्मानित केले असल्याने त्यांचा सत्कार व विविध विषयासाठी बैठक आयोजित केली होती.शिवाजी फुलवळ,देवराव नारे,मोहन जोगदार, व पत्रकार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण भवरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी हिप्परगा येथील सरपंच प्रकाश गारोळे, संताजी पांढरे, साहेबराव गोपुलवाड, राचोटकर उपसरपंच व पांचाळ यांचा सत्कार करून महाराष्ट्र ग्राम रोजगार सेवक संघटना तालुका नायगावची कार्यकारणीत अध्यक्ष अशोक बैश, उपाध्यक्ष संताजी पांढरे, सचिव प्रकाश बैलकवाड, यासह कुंटूर सर्कल प्रमुख यादव हनवटे, हनुमंत परडे, बरबडा वाघमारे मनुरकर, प्रकाश गारोळे, नरसी काशिनाथ शिंपाळे, सचितानंद पवार, मांजरम चंद्रकांत शिंदे, संतोष ईबितदार या पूर्वीचीच कार्यकारणिची फेरनिवड करण्यात आली. यावेळी उत्तम हनुमंते, यादव हनवटे, रावसाहेब बेलकर, शिवाजी ढगे, इंगळे, नारायण गायकवाड, धोंडीबा गायकवाड, गायकवाड सातेगावकर यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here