Home बीड अण्णा भाऊ साठेचं स्मारकास समाज निधीतून का आ.प्रकाश सोळंके यांच्या निधीतून का...

अण्णा भाऊ साठेचं स्मारकास समाज निधीतून का आ.प्रकाश सोळंके यांच्या निधीतून का नाही — दिपक थोरात

85

✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी):-9075913114

बीड(दि.2मार्च):-माजलगाव मतदार संघातील विविध प्रश्नासाठी मागासवर्गीय समाजातील दलित वस्ती निधीसाठी आमदार प्रकाश सोळंके यांनी मातंग समाजावर वेळोवेळी अन्याय केला आहे माजलगाव शहरातील गेल्या तीन-चार दिवसांपूर्वी आ प्रकाश सोळंके यांनी एक पत्रकार परिषद घेऊन छत्रपती शिवाजी महाराज डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारणार म्हणून घोषणा केली.

पण यामध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारक उभारणार याचं मातंग समाज स्वागत करतो पण आ. प्रकाश सोळंके यांना अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा विसर का पडलेला आहे की अण्णाभाऊ साठे चौक माजलगाव येथील अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासाठी माजलगाव मतदार संघातील सर्व गावातील मतदारसंघांमध्ये माजलगाव शहरांमध्ये पुतळा उभारून स्मारक सुशोभीकरण करावेत पण संबंधित पत्रकार परिषद घेताना आ. प्रकाश सोळुंके म्हणतात की मी छत्रपती शिवाजी महाराज डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभा करत आहे म्हणून पत्रकार परिषद घेऊन नगरपरिषदेच्या तोंडावर जिल्हा परिषद इलेक्शन च्या तोंडावर स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी पुन्हा स्मारकाचा मुद्दा समोर आणत आहेत पण आ. प्रकाश सोळंके यांना विसर पडलेला आहे की माजलगाव येथील अण्णाभाऊ साठे यांचेही स्मारक झाले पाहिजे आणि त्यासाठी निधी उपलब्ध करावा स्वर्गीय एकनाथराव जी आव्हाड साहेब आज जर असते तर माजलगाव सह महाराष्ट्रातील मातंग समाजाला नेतृत्वाखाली सर्व जाती धर्मातील मागासवर्गीय लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी एक जहाल नेतृत्व होतं पण आ.प्रकाश सोळंके यांची यांनी स्वर्गीय एकनाथ आव्हाड यांना शेवटच्या क्षणापर्यंत विरोधच करत राहिले त्याचाच एक भाग म्हणून माजलगाव येथील अण्णाभाऊ साठे यांचे एक स्मारक आज उभा न करण्याचे षड्यंत्र आ. प्रकाश सोळंके यांच्याकडून होत आहे जर आज स्वर्गीय एकनाथ आव्हाड साहेब असते तर आ. प्रकाश सोळंके यांची हिंमत झाली नसती अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक डावण्यासाठी स्मारकाचा निधी हा डावल्यामुळे मातंग समाजामध्ये प्रचंड नाराजी आज या ठिकाणी आहे पण आ.प्रकाश सोळंके यांना निवडून आणण्यासाठी त्या मातंग समाजाच्या नेत्यांचा सिंहाचा वाटा आहे माजलगाव मतदारसंघांमध्ये आहे याचाही विसर आमदार प्रकाश सोळंके यांना पडत आहे पण येणारे जिल्हा परिषद नगर परिषद पंचायत समिती मध्ये त्यांना त्यांची जागा मातंग समाज दाखवून देईल आ.प्रकाश सोळुंके यांना त्यांच्या मी पणाचा अहंकार आहे मानवी हक्क अभियान या संघटनेने गप्प बसून चालणार नाही.

तर आमदार प्रकाश सोळंके यांच्याकडे पाठपुरावा करून अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक माजलगाव शहरामध्ये उभा करण्यासाठी पुढाकार घ्यावा फक्त मातंग समाजाचे मतदान मागण्यासाठी व आ. प्रकाश सोळंके यांच्या पुढे पुढे करून स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी मातंग समाजाचे नेते मंडळींनी या ठिकाणी केविलवाणा प्रयत्न करू करतात अन्यथा येणाऱ्या काळामध्ये मातंग समाज आपल्याला नक्कीच जागा दाखवून देईल या ठिकाणी आ. प्रकाश सोळंके यांना मी एक पत्र लिहील आहे जाब विचारणारण्यासाठी आहे संबंधित पत्रामध्ये स्वर्गीय एकनाथ आव्हाड यांच्या विचारांना डावलून आ. प्रकाश सोळुंके हे मातंग समाजाला विकासापासून वंचित ठेवत आहेत आज मातंग वस्त्यांमध्ये प्रत्येक गावांमध्ये माजलगाव मतदार संघामध्ये कित्येक गावांमध्ये रोड नाली पाणी घरकुल गायरानधारकांची प्रश्न राशन दुकानाची प्रश्न सह विविध मागण्यांची आज मातंग समाजाला माजगाव मतदारसंघांमध्ये याची कमतरता भासत आहे याचे एकमेव कारण म्हणजे स्वर्गीय एकनाथ आव्हाड यांच्या निधनानंतर मातंग समाज आज उघडा पडला आहे त्यांनी मातंग समाजाला जे जे प्रश्न असतील त्या त्या प्रश्नावर त्या त्या वेळोवेळी आवाज उठवून समाजाला न्याय देण्याचे काम या ठिकाणी स्वर्गीय आव्हाड साहेब यांनी केलेला आहे पण आज रोजी आ. प्रकाश सोळंके यांनी निवडून येत असताना मातंग समाजातील विविध प्रश्नांवर व मुख्य म्हणजे मातंग समाजाचे दैवत महापुरुष लोकशाहीरअण्णाभाऊ साठे यांच्या माजलगावच्या स्मारकाला डावललं आहे स्मारकाला याठिकाणी विरोध केलेला आहे.

त्या विरोधाला आम्ही विरोध करत आ. प्रकाश सोळंके यांचा जाहीर निषेध करतो या ठिकाणी प्रकाश सोळुंके यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक उभे केले किंवा त्यासाठी निधी उपलब्ध केला त्याचे आम्ही स्वागत करतो व आभार मानतो व डॉ पण बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारका सोबत लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक उभारावे व मातंग समाजाचे नेते आज अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक समाज निधीतून उभारू अशी भाषा करत आहेत त्याना माझा प्रश्न आहे की मांतग समाज निधीतून उभारण्याची भाषा तुम्ही करतात तर तुम्ही आ.प्रकाश सोळंके यांना निवडून आणण्यासाठी रात्र दिवस पुढे पुढे का करत होतात आमदार प्रकाश सोळंके यांनी निधी उपलब्ध करून द्यावा अन्यथा आमदार च्या छाताडावर बसून निधी उपलब्ध करून घेईल मांतग समाज निधीतून कोणत्या मांगाच्या नेत्याला स्वताच्या खिशात तो स्मारकाचा निधी घालायचा आहे हे मांतग समाला माहिती आहे आणि जे समाजाकडून स्मारक निधी गोळा करण्याची भाषा करतात ते आ.प्रकाश सोळंके यांना भिंतात व स्वतापुर्त दादा करतात हे माजगाव मतदार संघातील मांतग समाजाला कळून चुकले आहे हे कळावे असे दिपक थोरात यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे म्हटले आहे व आ. प्रकाश सोळंके यांना एकपत्र लिहिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here