Home महाराष्ट्र घुग्घुस पोलीस स्टेशन अंतर्गत सायबर जनजागृती रॅली

घुग्घुस पोलीस स्टेशन अंतर्गत सायबर जनजागृती रॅली

111

✒️पंकज रामटेके(घुग्घुस प्रतिनिधी)

घुग्घुस(दि.2मार्च):-बुधवार 2 मार्च रोजी पोलीस स्टेशन अंतर्गत जनता विद्यालय घुग्घुसच्या विद्यार्थ्यांनी सायबर सुरक्षा सप्ताह निमित्त जनजागृती रॅली काढली.दिनांक 1 मार्च ते 8 मार्च पर्यंत पोलीस स्टेशन अंतर्गत सायबर सुरक्षा सप्ताह राबविण्यात येत आहे.

ही रॅली घुग्घुस पोलीस स्टेशन येथून निघाली जुना बसस्थानक मार्गे गांधी चौक ते आठवडी बाजार मार्गे फिरून परत पोलीस स्टेशन येथे समाप्त करण्यात आली.

यावेळी ठाणेदार बबन पुसाटे, सहा. पो. नि. संजय सिंग, गोपनीय विभागाचे दिनेश वाकडे, वाहतूक विभागाचे गजानन झाडे, विनोद लोखंडे, राहुल मसाडे, गुन्हे पथकाचे रंजित भुरसे, ज्ञानेश्वर जाधव, रवी वाभीटकर, जनता विद्यालयाचे शिक्षक बंडू नगराळे, राजू बोभाटे, संतोष उपगंदलावार व विद्यार्थी सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here