



✒️प्रदिप रघुते(अमरावती प्रतिनिधी)मो:-9049587193
मोर्शी(दि.2मार्च):- विभाग युनिटची धडाडीची कार्यवाही 1/3/2022 रोजी अमरावती जिल्हा एक्साईज विभागाचे माननिय अधिक्षक ज्ञानेश्वरी अहेर , यांचे मार्गदर्शन खाली मोर्शी एक्साईज विभागाचे निरीक्षक पुरुषोत्तम बोढारे.सहाय्यक निरिक्षक श्री रवी राउतकर.व जवान दिनकर तिडके.व थोरात या पथकाने मंगळवारी सकाळपासून शिंदवाडी तसेच अमरावती व वर्धा जिल्ह्याच्या सिमेवर असलेल्या वर्धा नदी वरील कौडण्यपुर शिवारात धाडसत्र मोहीम राबवुण आरोपी अनुक्रमे सुरेंद्र हरिच्रद श्रीरामे वय 42वर्ष रा.देवुरवाडा जि.वर्धा.तसेच राजेंद्र नामदेवराव जी वानखडे वय 59वर्ष रा.देवुरवाडा जि.वर्धा यांना गावठी दारू तयार करताना अटक करण्यात आली.
या कार्यवाही मध्ये एकुण 174लिटर गावठी दारु तसेच 7480लिटर मोहा रसायण व गावठी दारु तयार करण्याचे साहित्य जप्त करण्यात आले असुन ..इतर औंवैध धंदे वाल्यांचे धाबे दणाणले असल्याची चर्चा जोर धरत आहे.सदर मोहीम मोर्शी एक्साईज विभागाचे निरीक्षक पुरुषोत्तम बोढारे यांच्या यांच्या पथकाव्दारे करण्यात आली..





