




🔹प्रबोधनातून दिला व्यसनमुक्तीचा संदेश
✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)
पुसद(दि.2मार्च):- तालुक्यातील पार्डी येथे करणभाऊ ढेकळे राष्ट्रवादी युवक काॕग्रेस प्रदेश सरचिटणीस यांच्या वाढदिवसानिमित्त सत्यपाल महाराजांचे शिष्य पंकजपाल महाराज यांचा प्रबोधनाचा कार्यक्रम संपन्न झाला.त्यांनी प्रबोधनातुन उपस्थित गावकऱ्यांना दारूबंदी, व्यसनमुक्ती, संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान आदी विविध विषयावर प्रबोधनातुन संदेश दिला आहे.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुसद विधानसभेचे युवा आमदार इंद्रनीलभाऊ नाईक, आयोजक करण ढेकळे, तर प्रबोधनकर्ते म्हणुन पंकजपाल महाराज हे होते.
प्रमुख अतिथी म्हणून दत्तात्रेय जाधव, अशोक गोरे, ज्ञानेश्वर वाठ, गजानन गोरे, अरुण ढेकळे, शिवाजी पैठणकर,राजकुमार झरकर . देविदास झरकर, दादाराव ढेकळे, बाबूसिंग राठोङ, ङाँ.संजय मते.संतोष देशमुख बाळासाहेब पाटील.प्रभू ढोले.कामाजी मुधळ.संजय कानङे बबन अल्लङवार.विष्णू केवटे,बाबाराव ढेकळे, ग्रा.प.सदस्य समाधान केवटे, बाबाराव अंभोरे, सुनिल राठोङ, राजू मोरे, नंदू कांबळे, विकी झरकर, ज्ञानेश्वर राठोड, रामदास केवटे, सलीमभाई, संदीप भोणे,अजय गरङ समाधान शिनगारे, ओंकार पवार, रितेश झरकर.विक्की अंभोरे. विनोद वाघमारे.मान्यवर मंचावर उपस्थित होते.
यावेळी सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महामानवाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी आमदार इंद्रनिलभाऊ नाईक यांच्या हस्ते माणुसकीची भिंत सोशल फाउंडेशन पुसदचे अध्यक्ष गजानन जाधव, ब्लड लाईन डायरीचे संचालक मारोती भस्मे, रक्तसंजवनी ग्रूपचे ऋषिकेश टणमने, रुग्णसेवा ग्रूपचे शंतीसागर इंगोले यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी पंकजपाल महाराज म्हणाले की, वाढदिवस साजरा करण्यासाठी इतरत्र खर्च न करता सामाजिक उपक्रमांवर खर्च करावा असे त्यांनी सांगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरेंद्र ढोले यांनी केले. तर आभार प्रदर्शन अरुण बरङे यांनी मानले.कार्यक्रमाला गावातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे आयोजन करणभाऊ ढेकळे मित्र मंङळ भीम टायगर सेना माळी युवा मंच यांनी केले होते.




