Home महाराष्ट्र दिव्यांगांना जीवनात आनंद देण्याचे कार्य* जिल्हाधिकारी गोयल 80 दिव्यांगांना मोफत अव्यय वाटप

दिव्यांगांना जीवनात आनंद देण्याचे कार्य* जिल्हाधिकारी गोयल 80 दिव्यांगांना मोफत अव्यय वाटप

93

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.1मार्च):-सर्वसामान्य व्यक्ती पेक्षा दिव्यांग व्यक्ती आपल्या जीवनामध्ये स्वतःला अधुरा समजत असतो त्यामुळे तू थोडा निरुत्साही असतो मात्र भोलाराम कांक्रिया जी व नारायण सेवा संस्थेच्या मंजुषा दर्डा यांनी दिव्यांगां च्या जीवनात परिवर्तन घडवून आनंद देण्याची कार्य काम करत आहे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी आचल गोयल यांनी गंगाखेड येथे पूजा मंगल कार्यालयात दिव्यांग व्यक्तींना मोफत अव्यय वाटप शिबिर कार्यक्रम प्रसंगी बोलत होत्य.दिनांक 11 मार्च भोलाराम कांक्रिया चारीटेबल ट्रस्ट व नारायण सेवा संस्था उदयपूर यांच्या वतीने 80 दिव्यांग व्यक्तींना मोफत अव्यय वाटप शिबीर कार्यक्रम झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महेश अर्बन बँकेचे अध्यक्ष घनश्याम मालपाणी हे होते.

तर व्यासपीठावर उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील तहसीलदार गोविंद हरणे हृदय रोग तज्ञ सिद्धार्थ भालेराव वैद्यकीय अधीक्षक डॉ हेमंत मुंडे अस्थिरोग तज्ञ डॉ मनीष बियाणी सुभाष गेलडा बाळासाहेब राखे संयोजिका ट्रस्ट सचिव मंजुषा दर्डा आदी उपस्थित होते
पुढे बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले की ट्रस्टचे सामाजिक काम कार्य पाहून मी भारावून गेले आहे जिथे आम्हा प्रशासनाला मदतीसाठी मर्यादा पडतात अशा ठिकाणी मंजुषा दर्डा सारखी व्यक्ती प्रशासनासह गरजुन गरजूंना मदतीसाठी धावून येतात यावेळी प्रास्ताविकपर मनोगतातून मंजुषा दर्डा म्हणाल्या की मी एवढे काम आपल्या सर्वांच्या साथी मुळेच करू शकते मी एक मात्र त्यातली आहे हे कार्य कुठल्या स्वार्थासाठी नव्हे तर माझ्या मनाला आनंद मिळण्यासाठी करत असते यावेळी दर्डा भावनिक भावुक झाल्या होत्या. बाळासाहेब राखे यांनी मंजुषा दर्डा च्या परिवाराची कार्य व संस्कारा विषयी विचार मांडले.

बहारदार असे सूत्रसंचालन पूजा दर्डा यांनी तर आभार प्राचार्य डॉ मुंजाजी चोरघडे यांनी मानले शिबीर यशस्वीतेसाठी नारायण सेवा संस्थान उदयपूर चे शिबीर प्रमुख हरिप्रसाद लड्डा टेक्निशियन किशन कुमार बजरंग चौधरी गोपाल गोस्वामी तर ट्रस्ट चे उपाध्यक्ष रमेश धोका सुजता पेकम अमर करंडे वृषभ दर्डा शुभम अच्छा आनंद ठोका रमेश धोका सिद्धार्थ दादा हर्ष आंधळे मंगल ताई अच्छा रमेश औसेकर लाला अनावडेबसंतोष तापडिया दिलीप सोळंके भगत सुरवसे गोपी मुंडे आदींनी परिश्रम घेतले.यावेळी महेश अर्बन बँकेचे नवनियुक्त आध्यक्ष पदी निवड झाल्या बद्दल घनश्याम मालपणी यांचा ट्रस्ट वतीने भव्य स्तकार करण्यात आला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here