




✒️रोशन मदनकर(उप संपादक)
गडचिरोली(आरमोरी)दि. 1मार्च):-गडचिरोली – गोंदिया जिल्ह्यातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी, कौशल्य, व्यवसायीक, विकासात्मक, रोजगारभिमुख प्रशिक्षण देण्यात अल्पावधीत अग्रेसर होणाऱ्या जन शिक्षण संस्थेच्या अशासकीय ( बोर्ड ऑफ मॅनेजमेंट) सदस्य पदी प्रिती संजय सोनकुसरे यांची निवड करण्यात आली.
प्रिती संजय सोनकुसरे यांनी कृषी आधारावर मच्छिपालन प्रशिक्षण, आरगॉनिक फार्मिंग, क्राप रोटेशन, अॅनिमल हजबंडरी, यासारख्या अनेकविध विषयांवर प्रशिक्षण आणि मार्गदर्शन दिले आहे. भारत सरकारच्या माध्यमातून जन शिक्षण कौशल्य विकास उपजिवीका प्रशिक्षण संस्थेने गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी दुर्गम भागात विविध प्रकारचे कौशल्य विकास प्रशिक्षण सुरू केले आहे. या संस्थेच्या बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या सदस्य पदी नियुक्ती झाल्याबद्दल सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.




