Home महाराष्ट्र अज्ञात वाहनाच्या धडकेत कोल्ह्याचा मृत्यू

अज्ञात वाहनाच्या धडकेत कोल्ह्याचा मृत्यू

120

✒️खटाव प्रतिनिधी(नितीन राजे)

सातारा(दि.1मार्च):- जिल्ह्यातील पुसेगाव वडूज रस्त्यावर खातगुन बस थांब्याजवळ सोमवारी रात्री कोल्हा ला अज्ञात वाहना नेधडक दिल्याने कोल्याचा मृत्यू झाला.पुसेगाव खटाव रस्त्यावर खादगुन भांडेवाडी या ठिकाणी वनीकरणाचा छोटासा भाग असून वन्यजीव कायद्याची अंमलबजावणी होत असल्याने प्राण्यांचा वावर या ठिकाणी वाढलेला आहे.

रात्रीच्या वेळी अनेक श्वापदे या रस्त्यावर दिसतात. खटाव ते पुसेगाव दरम्यान भांडेवाडी आणि खतगुन नजीक वनीकरणाचा भाग असून मधून रस्ता आहे वाहने वेगाने असल्याने ससे,कोल्हे ,लांडगे ,तरस, ही जंगली जनावरे कळतात याठिकाणी शेतीचे बागायत क्षेत्र चांगले असल्याने जंगली श्वापदांचा वावर याठिकाणी वाढलेला आहे वनविभागाने या ठिकाणी सूचना फलक लावून वाहनचालकांना वाहने सावकाश चालवण्याचा सूचना करण्याची मागणी होत आहे. तसेच वन विभागाचे टोल फ्री क्रमांक देखील लिहावेत म्हणजे अशा काही घटना घडल्या वनविभागाला याची माहिती मिळावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here