Home महाराष्ट्र महाशिवरात्री निमित्य नागभीड शिवटेकडी येथे आरोग्य सेवा

महाशिवरात्री निमित्य नागभीड शिवटेकडी येथे आरोग्य सेवा

68

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

नागभीड(दि.1मार्च):-शिवटेकडी , नागभीड येथे महाशिवरात्री निमित्य भाविकांची मोठी गर्दी उसळते . या पार्श्वभुमीवर प्राथमिक आरोग्य केंद्र , नवेगाव पांडव च्या वतीने टेकडीच्या पायथ्याशी भाविकांसाठी प्रथमोपचार केंद्र सुरु करण्यात आले आहे . सोबतच ज्यांनी अजुनही पोलिओ डोज घेतलेले नाहीत त्यांच्यासाठीही सोय उपलब्ध करुन दिलेली आहे .

या केंद्रावर आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी भेट देत सुरु असलेल्या सेवाकार्याची माहिती घेतली . याप्रसंगी प्राथ.आरोग्य केंद्र , नवेगाव पांडव च्या रुग्ण कल्याण समितीचे अध्यक्ष व जि.प.सदस्य तथा भाजपा जिल्हा महामंत्री संजय गजपुरे यांनी भेट देत समाधान व्यक्त केले. यावेळी पं.स. सदस्य संतोष रडके , नागभीडचे नगराध्यक्ष प्रा.डॅा. उमाजी हिरे , उपनगराध्यक्ष गणेश तर्वेकर यांची उपस्थिती होती .या उपक्रमात वैद्यकीय अधिकारी डॅा. आकाश चकोले , आरोग्य सहाय्यक वामन बारापात्रे , आरोग्य सेविका अर्चना निखार , आरोग्य सेवक सुरज पिलाने व इतर कर्मचारी आरोग्यसेवेसाठी उपलब्ध आहेत .

Previous article*नांदगाव खंडेश्वर तालुका पोलिस पाटील संघटनेच्या वतीने पोलीस पाटील दिनाचे आयोजन
Next articleअज्ञात वाहनाच्या धडकेत कोल्ह्याचा मृत्यू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here