



✒️प्रदिप रघुते(अमरावती प्रतिनिधी)मो:-मो9049587193
अमरावती(दि.1मार्च):-नांदगाव खंडेश्वर,लोणी टाकळी, आणि मंगरुळ चव्हाळा पोलीस स्टेशनच्या पोलीस पाटील यांच्या संयुक्त विद्यमाने वृंदावन लॉन लोणी येथे पोलीस पाटील स्नेहमेळावा संपन्न झाला. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उप विभागीय अधिकारी मा.इब्राहीम चौधरी साहेब, तसेच प्रमुख अतिथी उपविभागीय पोलिस अधिकारी मा.जगदाळे साहेब, पोलीस निरीक्षक मा.कुलवंत साहेब, पोलीस निरीक्षक मा. ठाकरे साहेब, सेवानिवृत्त सपोनी मा.सोळंके साहेब उपस्थित होते. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मा.बाळासाहेब भागवत, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष मा. संतोषभाऊ महात्मे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सौ.राखीताई रिठे पाटील, तालुका पो. पा. अध्यक्ष योगेश पाटील फुके, मंगरुळ चव्हाळा पोलीस स्टेशन अध्यक्ष प्रदिप राऊत , लोणी टाकळी पोलीस स्टेशन अध्यक्ष विनोद चोपडे ,श्याम ढेरे पाटील, जिल्हा उपाध्यक्ष अँड.वानखडे पाटील विचारमंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय इब्राहिम चौधरी साहेब यांनी पोलीस पाटील यांना संबोधित करताना म्हटले की, पोलीस पाटील हे कायदा व सुव्यवस्था निर्माण करण्याच्या प्रक्रियेतील महत्त्वाचा दुवा असून त्यांनी आपल्या कार्यकक्षेत राहून योग्य कार्य केल्यास आपण कायम त्यांना सहकार्य करू असे मत व्यक्त केले. प्रमुख अतिथी हेमंतजी ठाकरे साहेबांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात पोलीस पाटील हा कायदा व सुव्यवस्था निर्माण करण्यासाठी पोलिस विभागाचा तिसरा डोळा आहे असे म्हणाले.या निमित्ताने राज्यातील पोलीस पाटील यांच्या प्रलंबित प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी कायम सहकार्य करत पुढाकार घेणाऱ्या जिल्हा बँकेच्या संचालक सौ.सुरेखाताई ठाकरे यांचा सत्कार करण्यात आला, सोबतच सेवानिवृत्त पोलिस पाटील यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आणि कोरोनाच्या संघर्ष काळात कर्तव्य बजावत असताना धाने पाटील यांचे दुःखद निधन झाल्याने त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.





