




🔹जिल्हा काँग्रेस कमिटी च्या वतीने मार्कंडा यात्रे करिता मोफत बस चा शुभारंभ
✒️रोशन मदनकर(उप संपादक)
गडचिरोली(दि.1मार्च):-मागील काही महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप असल्याने महाशिवरात्री निमित्ताने मार्कंडा देवदर्शनाकरीता जाणाऱ्या भाविक भक्तांची गैरसोय होऊ नये याकरीता गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने गडचिरोली ते मार्कंडा मोफत बस ची व्यवस्था करण्यात आली असून, जिल्हा काँग्रेस कार्यालय गडचिरोली येथून राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना. विजय वडेट्टीवार व जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी बस ला हिरवी झेंडी दाखवून महाशिवरात्री निमित्त चालणाऱ्या मोफत बस चे शुभारंभ केले.
यावेळी माजी आम.तथा प्रदेश महासचिव डॉ.नामदेव उसेंडी, प्रदेश महासचिव तथा जिल्हा निरीक्षक डॉ.नामदेवराव किरसान, प्रदेश सचिव डॉ.नितीन कोडवते, काँग्रेस जेष्ठ नेते रामभाऊ मेश्राम, शहराध्यक्ष सतीश विधाते, जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष शंकराव सालोटकर, राजेश कात्रटवार, रमेश चौधरी, ता.अध्यक्ष नेताजी गावतुरे, किसान सेल अध्यक्ष वामनराव सावसाकडे,ओबीसी सेल अध्यक्ष पांडुरंग घोटेकर, स्वयंम रोजगार सेल अध्यक्ष काशीनाथ भडके, जिल्हा सचिव सुनील चडगुलवार, नंदू कायरकर, अनुसूचित जाती महिला अध्यक्ष अपर्णा खेवले, हरबाजी मोरे, आशीष कांबळी, समीर ताजने, सुरेश भांडेकर, भैयाजी मुद्दमवार, शालीग्राम विधाते, व्ही.जी. गिरसावळे, आय.बी.शेख, अब्दुल पंजवानी, फिरोज हुद्दा, कृष्णा झंजाळ, राकेश रत्नावार, बाबूराव गडसुलवार, संदीप अजमिरे, विश्वनाथ राजनहीरे, वसंत राऊत, संजय चन्ने, विपुल येलेट्टीवार, कुणाल ताजने, भावना वानखेडे, कल्पना नंदेश्वर, लता मुरकुटे, शीला जनबंधु, नीता वडेट्टीवार सह अनेक मान्यवर मार्कंडा करीत जाणारे भाविक यावेळी उपस्थित होते.




