



✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114
बीड(दि.1मार्च):- जिल्ह्यात सुरू असलेल्या हवाला रॅकेटचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे. आयकर चुकवून पैशांचा बेकायदा व्यवहार करणारे हे हवाला रॅकेट पोलिसांनी उघडकीस आणले आहे. सहायक पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने, बीड शहरात 3 ठिकाणी छापेमारी करत 51 लाखांची रक्कम जप्त केलीय. तर हे रॅकेट चालवणाऱ्या 3 फर्मच्या 3 व्यवस्थापकांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. आयकर चुकवून टोकन पैशांची फिरवाफिरवी करणारे काही जण बीडमध्ये हवाला रॅकेट चालवत असल्याची माहिती, पंकज कुमावत यांना मिळाली होती.
काल उशिरा पोलिसांनी छापमारी करत ही कारवाई केलीय. पोलिस पथकाने शहरातील कबाड गल्लीतील न्यू इंडिया अंगडिया येथे कारवाई करत, 35 लाख 79 हजार रुपये, जालना रोडवरील आर.क्रांती ट्रेडर्स येथे 9 लाख रुपये तर सिध्दीविनायक व्यापारी संकुलासमोरील येथे 6 लाख 41 हजार रुपये, अशी एकूण 51 लाख 26 हजार रुपयांची बेकायदा रोकड आढळून आलीय. दरम्यान, यावेळी पोलिसांनी मयूर विठ्ठल बोबडे, हरीश रतीलाल पटेल, सूरज पांडुरंग घाडगे या 3 व्यवस्थापकांना ताब्यात घेतले आहे. असून बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या कारवाईने बीड जिल्ह्यात खळबळ उडाली असून आणखी हवाला रॅकेटचे मोहरे पोलिसांच्या ताब्यात लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.


